चंदीगड : महिला कुस्तीपटू विनेश फोगाटला (Vinesh Phogat) हरियाणा सरकाकडून ४ कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती. मात्र, आता विनेश फोगाट या ऑफरला घेऊन आनंदी नसल्याचे समजते. राज्य सरकारकडून आणखी एक फ्लॅटची मागणी केली आहे. त्यामुळे ती आता चांगलीच चर्चेत आली आहे. तिला राज्य सरकारने तीनपैकी एक पर्याय दिला होता. तिला एकाच पर्यायावर समाधान नसल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. तिने एक नाहीतर दोन सुविधांची मागणी केली आहे.
हरियाणा सरकारने विनेश फोगाटला तीन ऑफर दिल्या होत्या, त्यातील पहिल पर्याय म्हणजे ४ कोटी रुपये, दुसरी सं हरियाणा शहरी विकार प्राधिकरणाचा प्लॉट, तसेच सरकारी नोकरी असे तीन पर्याय देण्यात आले होते. मात्र, विनेश फोगाटने पैशांसह प्लॉटची मागणी केली आहे.
एका वृत्तमाध्यमानुसार, २५ मार्च रोजी मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी घोषणा केली होती की, विनेश फोगाटला विशेष महत्त्व देत ३ ऑफर देण्याचा निर्णय घेण्यात आला, तिनं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दाखल होत ५० किलो महिला वजनी गटात अंतिम सामन्यात प्रवेश केला होता, पण अंतिम क्षणी आवश्यक वजनाहून १०० ग्रॅम वजन अधिक भरल्याने तिला बाद करण्यात आले. यामुळे तिला अंतिम सामना न खेळताच बाद केले गेले.
त्यानंतर क्रीडा विभागाने फोगाटला पत्र पाठवून बक्षीसरुपी संधीद्वारे तीन पर्याय दिले होते. अशावेळी विनेश फोगाटने ४ कोटी रुपये घेतले, त्यासोबतच तिने फ्लॉटची मागणी केली होती. तिला तीन पैकी एकच पर्याय निवडायचा होता, नंतर तिने तिन्ही पर्याय निवडले. विनेश फोगाट सध्या आमदार असून तिला 'अ'गटाची नोकरी मिळण्याची शक्यता कमी आहे,असे एका अधिकाऱ्याने माहिती दिली.