वक्फ सुधारणा विधेयकाविरोधात तृणमूल काँग्रेसच्या नेत्याची कोलकाता बंद ठेवण्याची धमकी, वाहतूक रोखून १० हजार जणांचा जमाव रस्त्यावर उतरणार?
11-Apr-2025
Total Views |
कोलकाता : प.बंगालमध्ये वक्फ सुधारणा कायद्याविरोधात (Waqf Amendment Bill) तृणमूल काँग्रेस आणि मुस्लिम संघटनांनी मोठ्या प्रमाणात निदर्शने दर्शवली आहेत. अशातच गुरूवारी कोलकात्यामध्ये रामलीला मैदानावर जमियत-ए-उलेमा हिंदच्या प.बंगाल शाखेने आयोजित केलेल्या एका भव्य रॅलीला तृणमूल काँग्रेस नेते आणि मंत्री सिद्दीकुल्लाह चौधरी यांनी संबोधित केले आहे.
वक्फ कायद्यात करण्यात आलेली दुरुस्ती तात्काळ मागे घेण्याची मागणी करत मंत्र्यांनी कोलकात्यात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण करण्याची धमकी दिली आहे. त्यानंतर त्यांनी सभेला संबोधित करताना म्हटले की, त्यांना हवे असल्यास ते वाहतूक विस्कळीत करून कोलकाता बंदची हाक देऊ शकतात.
जर कोलकात्यात वाहतूक कोंडी निर्माण करायचीच असेल तर आपण कोलकात्यातील ५० ठिकाणी २००० लोकांचे गट पांगवत आपण वाहतूक ठप्प करण्याचा डाव असल्याचे ते म्हणाले. त्यानंतर पुढे चौधरी म्हणाले की, आम्ही अद्यापही काहीही एक केलेलं नाही. परंतु, नंतर आम्ही हे सर्व करून त्यासाठी आम्ही आता कोलकात्यावर पकड निर्माण केली आहे. कोलकात्यातील ५० ठिकाणी प्रत्येकी १०, हजार लोक असतील. त्यातील काहीजण येतील, बसतील, भात, गूळ आणि मिठाई खावून निघून जातील, बाकीचं त्यांना काहीही येणार नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. अशातच आता यावर भाजपचे नेते अमित मालवीय यांनी सोशल मीडियावर चौधरी यांच्या भाषणाचा व्हिडिओ शेअर केला आहे.
पूर्वा वर्धमानमधील मंगलकोटा मतदारसंघातील आमदारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपवर विशेषत: मुस्लिम समुदायाने लक्ष्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ते म्हणाले की, तृणमूल काँग्रेस सरकारच्या काळामध्ये प.बंगालमध्ये मुस्लिमांना अधिक सुरक्षित वाटते. त्यानंतर सिद्दीकुल्लाह चौधरी म्हणाले की, त्यांना मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता आणि त्यांनी प.बंगालमध्ये वक्फ सुधारणा विधेयक आम्ही मान्य करणार नाही, असा दावा त्यांनी केला. त्यांनी निदर्शनकार्त्यांना केंद्र सरकारने तो मागे घेत नाही तोवर आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे सांगितले.
सिद्दीकुल्लाह चौधरी गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील वक्फ सुधारणा कायद्याविरोधात निदर्शने करत आहेत. त्यांनी पुढे सांगितले की, कायद्याविरोधात एक कोटी लोकांच्या स्वाक्षरीचे पत्र नरेंद्र मोदी यांना पाठवले जाणार आहे. राज्याचे ग्रंथालय मंत्री असण्यासोबतच, सिद्दीकुल्लाह हे जमियत-ए- हिंदचे राज्याध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.