नवी दिल्ली: ( Threat from Mamata Banerjee Muslim minister ) वक्फ सुधारण कायदा मागे न घेतल्यास कोलकात्यात ५० ठिकाणी १० हजारांचा जमाव रस्त्यावर उतरविण्यात येईल, अशी धमकी ममता बॅनर्जी सरकारमधील मंत्री सिद्दीकुल्लाह चौधरी यांनी शुक्रवारी दिली आहे.
पश्चिम बंगालमध्ये वक्फ सुधारणा कायद्याविरोधात तृणमूल काँग्रेस आणि मुस्लिम संघटना मोठ्या प्रमाणात निदर्शने करत आहेत. त्याच अनुषंगाने, गुरुवारी कोलकाता येथील रामलीला मैदानावर जमियत-ए-उलेमा हिंदच्या पश्चिम बंगाल युनिटने आयोजित केलेल्या एका रॅलीला तृणमूल काँग्रेसचे नेते आणि मंत्री सिद्दीकुल्लाह चौधरी यांनी संबोधित केले.
सभेला संबोधित करताना सिद्दीकुल्लाह चौधरी म्हणाले की, जर आपल्याला कोलकाता ठप्प करायचा असेल तर आपण ५० ठिकाणी २००० लोकांना सहजपणे जमवू शकतो आणि वाहतूक रोखू शकतो.' आम्ही ते अजून केलेले नाही, पण आम्ही ते करण्याची योजना आखत आहोत. आमची रणनीती अशी आहे की जिल्ह्यांपासून सुरुवात करावी आणि नंतर कोलकात्यातील ५० ठिकाणी प्रत्येकी १०,००० लोकांना तैनात करावे, अशी धमकी त्यांनी दिली आहे.
हिंसाग्रस्त हिंदूंची अधिकारी यांनी घेतली भेट
पश्चिम बंगाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि भाजप आमदार सुवेंदू अधिकारी यांनी मंगळवारी पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यातील मोथाभरी या हिंसाचारग्रस्त भागाला भेट दिली. यापूर्वी, अधिकारी यांनी सांगितले. केला होता की हिंदू समुदायातील लोकांची सुमारे ८६ दुकाने आणि घरे लुटली जाऊन उद्ध्वस्त झाली आहेत.