तहव्वूर राणाची अंतिम घटका; एनआयए करणार चौकशी, १८ दिवसांची न्यायालयीन कोठडी
11-Apr-2025
Total Views |
नवी दिल्ली : मुंबईतील २६/११ च्या बॉम्बस्फोटातील मास्टरमाईंड तहव्वूर राणाची घटका आता भरलेली आहे. त्याला १० एप्रिल २०२५ रोजी अमेरिकेतून प्रत्यार्पित करण्यात आले आहे. अशातच आता त्याचे ११ एप्रिल २०२५ रोजी (NIA) चे एसपी आणि डीएसपी सीसीटीव्हीसमोर त्याला प्रश्न विचारून त्याच्याकडून सर्व माहिती जाणून घेणार आहेत. याची सर्व रेकॉर्डिंग करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयात राणाला १८ दिवसांची न्यायालयीन कोठडी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यादरम्यान, एनआयए यासंबंधित त्याच्या दैनंदिन कामाची माहिती जाणून घेणार आहेत. वय वर्षे ६४ असणाऱ्या राणाला एका विमानाद्वारे भारतात आणले गेले. दिल्लीतील पटियाला हाऊसमधील न्यायालयातील न्यायाधीश चंद्रजीत सिंग यांनी एका बंद खोलीत राणाची चौकशी केली, ही चौकशी मध्यरात्री २ वाजेपर्यंत सुरू होती. त्यानंतर संबंधित प्रकरणात राणाला न्यायालायीन कोठडी सुनावली आहे.
त्याचे काही फोटो समोर आले असून ज्यात तो एनआयएच्या अधिकाऱ्यांच्या तावडीत सापडल्याचे दिसून येत आहे. यूएस डिपार्टमेंट ऑफ जस्टिसने आणखी एक फोटो शेअर केला आहे. राणाला दिल्लीच्या तिहाड जेलमधील सुरक्षेच्या निगराणीखाली ठेवण्यात येणार आहे. अशातच, त्याला एका वॉर्डमध्ये ठेवण्यात येणार असून त्यासंबंधित माहिती अद्यापही समोर आलेली नाही.
तपास यंत्रणा एनआयए आणि खुफिया या संघटनांचे एक पथक बुधवारी राणाला आपल्यासोबत घेऊन अमेरिकेला पुन्हा रवाना होणार आहेत. गुरूवारी रात्री ६ वाजून ३० मिनिटांनी राणाला घेऊन अमेरिकन गल्फस्ट्रिम G550 विमान हे दिल्लीतील पालम टेक्निकल विमानतळावर उतरणार आहे. तसेच त्या ठिकाणी त्याचे मेडिकल चेकअप होणार आहे. त्यानंतर त्याला एनआयएच्या मुख्यालयात दाखल करण्यात येणार आहे.
तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणात अमेरिकेचे भारताला पाठबळ!
तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाबाबत अमेरिकेने म्हटले होते की, दहशतवादाच्या जागतिक समस्येचा सामना करण्यासाठी ते भारताच्या पाठीशी राहून भारताला मदत करतील. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या टॅम ब्रूस यांनी सांगितले की, हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांना जबाबदार धरण्यात येणार आहे, तसेच यामध्ये अमेरिकेने भारताला पाठबळ दिल्याने राणाचे प्रत्यार्पण होणं शक्य झालं.