मुंबई : मुंबईतील २६/११च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाला अखेर अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पित करण्यात आले आहे. संपूर्ण देशासाठी ही आनंदाची गोष्ट आहे. मात्र, संजय राऊत यावरूनही राजकारण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते.
संजय राऊत म्हणाले की, "तहव्वुर राणाला अमेरिकेतून भारतात आणले याचे कौतुक आहे. पण तहव्वुर राणाला फासावर लटकवण्यासाठी आणले की, क्रेडिट घेण्यासाठी ते स्पष्ट करावे. २००९ पासून सातत्याने राणाला आणण्यासाठी भारत सरकार प्रयत्न करत आहे. बिहार आणि पश्चिम बंगालच्या निवडणूकांआधी राणाला फासावर देतील आणि देशात राणा फेस्टिवल साजरा करतील," असे ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांतून २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाला अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पित करण्यात आले आहे. मात्र, याचे सर्व श्रेय काँग्रेस घेत हे काँग्रेस घेत असल्याची माहिती समोर येत आहे. यातच आता संजय राऊतांनीही हीच भूमिका घेत राजकारण सुरु केले आहे.