मुंबई : एमआयएम पक्षाचे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे. शुक्रवार, ११ एप्रिल रोजी इम्तियाज जलील उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल झालेत. दरम्यान, या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
शुक्रवारी दुपारी छत्रपती संभाजीनगर येथील माजी खासदार इम्तियाज जलील उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर पोहोचले. या भेटीमागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. परंतू, पत्रकारांनी संजय राऊतांना या भेटीबाबत विचारले असता आपल्याला माहिती नसल्याचे ते म्हणाले. मातोश्रीवर अनेक प्रमुख लोक चर्चेसाठी येत असतात. त्यातीलच एक इम्तियाज जलील आहेत, अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली आहे.