वक्फ सुधारित विधेयकाविरोधात प.बंगालच्या मुर्शिदाबादेत घमासान, कायदा हातात घेत निदर्शकांनी वाहने जाळली
11-Apr-2025
Total Views |
कोलकाता : वक्फ सुधारित विधेयका (Waqf Amendment Bill) विरोधात प.बंगालमधील मुर्शिदाबादेत ८ एप्रिल २०२५ रोजी निदर्शने दर्शवण्यात येत आहेत. यावेळी या निदर्शनादरम्यान २२ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. संबंधित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर पोलीस आरोपींची माहिती मिळवत आहेत. जंगीपुरचे पोलीस अधीक्षक, आनंद रॉय यांनी सांगितले की, या हिंसाचाराला घेऊन पोलिसांनी परिस्थिती लक्षात घेता स्वत:हून गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी बुधवारी परिवाराला भेट परिस्थितीचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे.
अशातच, निदर्शने कर्त्यांनी कायदा हातात घेत वाहनांची तोडफोड केली आहे. तसेच वाहनांना जाळत निदर्शनाला हिंसक वळण प्राप्त झाले आहे. यावेळी काही निदर्शने करणाऱ्यांनी दगडफेकही केली असून ज्यात पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचे वृत्त आहे.
वक्फ सुधारित विधेयक मंजूरीनंतर सर्वोच्च न्यायालयात १२ याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या ३ न्यायाधीशांमध्ये १० याचिकांवर येत्या १६ एप्रिल २०२५ रोजी सुनावणी केली जाणार आहे. या खंडपीठातील सरन्यायाधीश संजीव खन्ना, न्यायमूर्ती संजय कुमार आणि केव्ही विश्वनाथन यांचा यामध्ये समावेश असणार आहे. अशातच आता ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने देशभरात निषेध केला आहे.
दरम्यान, नुकतेच वक्फ सुधारित विधेयक संसदेत पार पडले होते. त्यावेळी केंद्रीय अर्थमंत्री अमित शाह यांनी वक्फ सुधारित विधेयकात बदल करण्यामागील कारण सांगितले, ज्यात अमित शाहांनी मुस्लिम महिला आणि गरीब मुस्लिमांना याचा फायदा होणार असल्याचा दावा केला. तसेच मुस्लिम वक्फची असणाऱ्या धार्मिक संपत्तीत इतर गैर मुस्लिम हस्तक्षेप करणार नाही. मात्र, अवैधपणे वक्फने हडपलेल्या जमिनीवर दावा करू पाहणाऱ्यांना न्यायालयात जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अशातच वक्फच्या संपत्तीवर काही गुंडांनी, काही राजकीय वरदहस्तांनी अवैधपणे जमीन बळकवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यावर अंकुश आणण्यासाठी वक्फ सुधारित विधेयकाच बदल करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.