जपानी सहप्रवाशावर लघुशंकेचा प्रयत्न, एअर इंडियाच्या दिल्ली ते बँकॉक विमानामधील गैरप्रकार उघड

    10-Apr-2025   
Total Views |

drunk indian national urinates on japanese national In delhi-bangkok air india flight
 
नवी दिल्ली : (Air India Airlines 'Pee-gate' 2.0) एअर इंडिया एअरलाईन्सच्या विमानातील गैरवर्तनाची आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एअर इंडियाच्या दिल्ली-बँकॉक विमानामध्ये एका भारतीय नागरिकाने जपानी सहप्रवाशावर लघवी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत एअर इंडियाने दिलेल्या निवेदनात केबिन क्रूने यावर तातडीने कारवाई केली असून भारतीय नागरी उड्डाण मंत्रालयाला ही बाब कळवल्याचे म्हटले आहे.
 
नेमकं काय घडलं?
 
याबाबत एअर इंडियाने भारतीय नागरी उड्डाण प्राधिकरण (DGCA) ला दिलेल्या माहितीनुसार, ही घटना बुधवारी ९ एप्रिल २०२५ रोजी दिल्ली ते बँकॉक फ्लाइट A12336 मध्ये घडल्याचे म्हटले आहे.या विमानातील प्रवासी तुषार मसंद याने आपले सहप्रवासी ब्रिजस्टोन इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर हिरोशी योशिजाने यांच्यावर लघूशंका केली. हिरोशी यांनी लगेच झाल्या प्रकाराची माहिती क्रू सदस्यांना दिली. त्यानंतर एअर इंडियाचे वरिष्ठ केबिन क्रू सदस्य सनप्रीत सिंग आणि ऋषिका मत्रे यांनी हिरोशी यांना सफाईसाठी मदत केली आणि तुषार मसंद याला दुसऱ्या जागेवर हलवले.
 
हिरोशी यांना त्यांचा पोशाख बदलण्यासाठी क्रूने मदत केली. दरम्यान, मॅथ्यू या प्रवाशाने सुरक्षिततेच्या कारणास्तव मसंद याला बिझनेस क्लासमधून बाहेर काढण्याची मागणी केली. यावेळी मसंद याने हिरोशी याची अनेकदा माफी मागितली. त्यानंतर हिरोशी यांनी तक्रार दाखल न करण्याचा निर्णय घेतला. तथापि, मसंद याला इशारा देण्यात आला आहे. तसेच त्याला बिझनेस क्लासमधून बाहेर काढण्यात आले.
 
"...आवश्यक ती कारवाई करू"; नागरी विमान वाहतूक मंत्र्याचे आश्वासन
 
हिरोशी यांना विमान उतरल्यानंतर बँकॉकमधील संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यासाठी एअर इंडियाने सांगितले. एअर इंडियाने म्हटले आहे की, स्वतंत्र समिती नेमून प्रवाशाविरुद्ध कारवाईचा निर्णय घेतला जाईल. दरम्यान, केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री के. राममोहन नायडू यांनी दिल्लीत पत्रकाराशी बोलताना सांगितले की, "मंत्रालय एअर इंडियाशी चर्चा करून या प्रकरणाचा तपास करेल आणि जर काही चुकले असेल तर, आम्ही आवश्यक ती कारवाई करू."
 
 

अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\