कोण आहेत वकील नरेंद्र मान? २६/११ चा सूत्रधार तहव्वूर राणा प्रकरणात सरकारी वकील म्हणून करण्यात आली नियुक्ती

    10-Apr-2025
Total Views |

Who is lawyer Narendra Mann?
 
नवी दिल्ली (Narendra Mann) : मुंबई  २६ /११ रोजी करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यातील मास्टरमाईंड तहव्वूर राणा याला अमेरिकेतून भारतात आणल्याची माहिती समोर आली आहे. त्याचे अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण केले जाणार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान, आता सरकारने राष्ट्रीय तपास यंत्रणेचा वापर करत संबंधित खटल्याच्या सुनावणीसाठी वकील नरेंद्र मान यांनी तीन वर्षांसाठी नियुक्ती केली आहे. 
 
 
 
कोण आहेत नरेंद्र मान ?
 
नरेंद्र मान हे एक प्रसिद्ध वकील आहेत. त्यांनी याआधी सीबीआयसाठी स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर या उच्च पदावर ते कार्यरित होते. २०१८ मध्ये त्यांनी एसएससी पेपरफुटी प्रकरणाचा खुलासा केला होता. इतर अनेक मोठ मोठ्या प्रकरणांचा यामध्ये समावेश आहे. इतर प्रकरणांमध्ये लक्ष घालत आता नरेंद्र मान यांना आता सरकारने मुंबई बॉम्बस्फोटाचा सूत्रधार असणाऱ्या तहव्वूर राणाच्या प्रकरणाचा खटला नरेंद्र मान लढवत आहेत.
 
सरकारकडून जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेद्वारे सांगण्यात येते की, नरेंद्र मान यांची निवड ही एनआयए खटला क्रमांक RC-04/2009/NIA/DLI शी संबंधित आहे. हे प्रकरण पाकिस्तानातील तहव्वूर हुसैन राणा आणि डेविड कोलमैन हेडलीविरोधात आहे. या दोघांवरही २६/११ बॉम्बस्फोटाचा आरोप करण्यात आला आहे. अशातच आता नरेंद्र मानने या खटल्याची सुनावणी दिल्लीतील एनआयए विशेष न्यायालय आणि संबंधित अपीलीय न्यायालयांमध्ये केले जाईल. त्यांची नियुक्ती ही केवळ तीन वर्षांसाठी करण्यात आली आहे.
 
अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने तहव्वूर हुसैन राणाचे भारतात प्रत्यर्पित करण्यास मान्यता दिल्यानंतर, त्याला १० एप्रिल २०२५ रोजी भारतात आणले गेले आहे. भारतात आल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणा त्याला आपल्या ताब्यात घेत त्याच्या चौकशीस सुरूवात करणार आहेत.