पैसे नकोत पण दोषींवर कारवाई करा! भिसे कुटुंबियांनी आर्थिक मदत नाकारली
10-Apr-2025
Total Views |
मुंबई : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने वेळेत उपचार न केल्याने तनिषा भिसे या गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. दरम्यान, शिवसेनेकडून भिसे कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यात आली होती. परंतू, भिसे कुटुंबियांनी ती मदत नाकारली असल्याचे सांगण्यात येत आहे.
तनिषा भिसे या उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गेल्या असता त्यांना १० लाख रुपये डिपॉजिट भरण्यास सांगण्यात आले. त्यामुळे उपचारास विलंब झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेचे राज्यभरात पडसाद उमटले असून रुग्णालयावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून भिसे कुटुंबियांना ५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली होती. शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे मंगेश चिवटे हे भिसे कुटुंबाची भेट घेत ही मदत देणार होते. परंतू, भिसे कुटुंबियांनी ही मदत नाकारली आहे. पैसे नकोत पण दोषींवर कारवाई करा. तसेच पुन्हा अशा घटना घेऊ नये यासाठी प्रयत्न करा, अशी मागणी तनिषा भिसे यांचे पती सुशांत भिसे यांनी केली आहे.