कोलकाता : बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी पश्चिम बंगालच्या स्कूल सर्व्हिस कमिशन घोटाळ्यासंबंधित नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आदेशाचा अवमान केला आहे. यामुळे आता सर्वोच्च न्यायालयाने ममता बॅनर्जींना अवमाननासंदर्भात नोटीस जारी करण्यात आली आहेय ही नोटीस वकील सिद्धार्थ दत्ताकडून स्वयंसेवी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून जारी करण्यात आली आहे.
ममता बॅनर्जी यांनी कोलकातामधील इंडोअर स्टेडियमवर नोकरीवरून बरखास्त करण्यात आलेल्या शिक्षकांची त्यांनी भेट घेतली. त्यावेळी न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा त्यांनी अवमान करत त्या म्हणाल्या की, कोणाचीही नोकरी जाऊ देणार नाही. मला अटक करा, मी सदैव तुमच्यासोबत असेल, असले म्हणत त्यांनी न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा अवमान केला आहे.
अशातच आता १० एप्रिल २०२५ रोजी जारी करण्यात आलेल्या अवमानना नोटीस सर्वोच्च न्यायालयाने ३ एप्रिल रोजी करण्यात आलेल्या निर्णयाला मध्यस्थानी ठेवक कोलकाता उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय कायम ठेवण्यात आला आहे.
राज्य शिक्षण आणि अवैधपणे शिक्षक म्हणून भरती केलेल्या २६ हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. यालाच आता एसएससी नोकरी घोटाळा असल्याचे कोलकाता उच्च न्यायालयाने सांगितले आहे.