सासरचे ५० लाख रुपये हुंड्याची करत होते मागणी, मायावरतीच्या भाचीने सासरच्यांचे पीतळ उघडे पाडले

    10-Apr-2025
Total Views |


Mayawati 
 
लखनऊ : उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांच्या भाचीने (Mayawati niece) आपला पती आणि सासरच्यांवर हुंड्याची मागणी केल्याने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. यावरून आता न्यायालयाने आदेश दिले आहेत की, हापुड कोतवालीत पती, सासू, साजरे,नणंद, मेहुणा, वहिनी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मायावरतीची भाची एलिसने ५० लाख रुपये हुंडा आणि फ्लॅट मागितल्याचा आरोप केला आहे. अशातच पती विशालकडून मुल न होण्याबाबतचा गौप्यस्फोट पीडितेने केला आहे.  
 
पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार सांगण्यात येत आहे की, पीडिता एलिसने आरोप करत सांगितले, ९ नोव्हेंबर २०२३ रोजी तिचा विवाह नवी दिल्लीतील एका हॉटेलमध्ये झाला होता. विवाहानंतर पती विशाल, सासरे श्रीपाल, सासु पुष्पा देवी, मेहुणा भूपेंद्र, वहिनी निशा नणंद शिवानी मावस सासरे अखिलेश यांनी हुंड्याची मागणी केली होती. 
 
 
 
पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, तिच्या सासरच्या मंडळींनी ५० लाख रुपये आणि गाजियाबादमधील इंदिरापुरममध्ये एका फ्लॅटची मागणी केली होती. त्यांचे म्हणणे होते की, मायावती ही बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा आहेत. त्यांच्याकडे अमाप पैसा असेल हा तर्क डोक्यात ठेवत त्यांनी ५० लाख आणि एक फ्लॅट अशी हुंड्याची मागणी केली. त्यानंतर पीडितेने हुंडा देण्यास विरोध दर्शवला. यामुळे पीडिता आणि तिच्या घरच्यांवर दबाव आणत शिवीगाळ करण्यात आली. 
 
पीडितेने आरोप केला की, तिचा पती शरीरसौष्ठवसाठी स्टेरॉइडचं इंजेक्शन घेतो. याबाबतची माहिती त्याच्या कुटुंबियांना होती, पण त्यांनी त्याबाबत कोणताही माहिती दिली नाही. त्याने घेतलेल्या स्टेरॉइडमुळ तो नपुंसक झाल्याचा आरोप पीडितेने केला. त्यामुळे तो आता विभक्त राहतो. पीडितेचे वैवाहिक जीवन विशालमुळे उद्ध्वस्त झाल्याचा आरोप केला आहे.