जयपूर : भगवान महावीर (Mahavir Jayanti) यांची २६२४ वी जयंती १० एप्रिल रोजी राजस्थानात श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाने साजरी करण्यात आली. जयपूर, अजमेर, सिकर, भिलवाडा, उदयपूर आणि कोटामध्ये राज्यातील अनेक शहरांमध्ये शोभायात्रा काढण्यात आल्या. या शोभायात्रांमध्ये भाविकांची अलोट गर्दी लोटली होती. यामुळे एक धार्मिक उत्साह शिकेला गेलेला दिसून आला होता. याचपार्श्वभूमीवर जैन धर्मातील प्रतिष्ठीत आणि प्रचलित असणाऱ्या मुनी भट्टारक प्रमेय सागर यांनी प्रभू श्रीराम आणि महावीर यांचे महत्त्व पटवून दिले आहे. तसेच जैन आणि सनातन धर्म एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. भारतात राहणारी प्रत्येक व्यक्ती ही हिंदू असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले होते.
महावीर स्वामीच्या जीवनावर अधारित अनेक प्रेरणादायी चित्रांची मिरवणूक काढण्यात आली होती. ज्यामुळे लोकांना धर्म, करुणा आणि अहिंसेचा संदेश दिला जात होता. जयपूरमध्ये १०८ प्रवेशद्वार सजवण्यात आलेला मार्ग, अजमेरमध्ये ३ किमी लांबीची काढण्यात आलेली शोभायात्रा, सिकरमध्ये शालेय मुलींचे स्वसंरक्षण आदी. दरम्यान, जैन मुनींनी धार्मिक सभेत महावीर हे सर्वांचे असल्याचा दावा केला होता.
यानंतर मुनी भट्टारक प्रमेय सागर यांनी धार्मिक सभेमध्ये सांगितले की, महावीर स्वामींचा संदेश हा केवळ जैन धर्मासाठी नाहीतर संपूर्ण मानवतेसाठी आहे. जैन धर्म आणि सनातन धर्म एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे सांगण्यात आले आहे. विविधतेसोबतच एकता ही भारताच्या धार्मिक परंपरांमध्ये खोलवर रुजवली गेलेली आहे.
ते म्हणाले की, ऋषभदेवांना राम आणि महावीरांना म ही नावे नाहीत, देशाच्या आत्म्याचे प्रतीक आहेत. मग तो शीख, ख्रिश्चन, जैन किंवा मुस्लिम असो या पृथ्वीवर वास्तव्य करणारा मानव हा भारतीय आहे. दरम्यान, यामध्ये नरेंद्र मोदी आणि राज्यपाल कटारिया यामध्ये भक्तीने सहभागी झाले होते.