अमेरिकेने भारतासोबत इतर ७५ देशांना दिला दिलासा, चिनींच्या करात १२५ % वाढीची टांगती तलवार

    10-Apr-2025
Total Views |

Donald Trump
 
वॉशिंग्टन डि.सी. : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी आयात शुल्काच्या किंमतीवर ९० दिवसांची बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फायदा हा भारताला झाला असून यासोबत इतर ७५ देशांना याचा फायदा होणार आहे. अशातच चीनला यापासून सूट दिली गेली आहे. चीनवर अमेरिकेने टॉरीफद्वारे १०४ % हून अधिक म्हणजेच १२५ % करात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिका-चीनदरम्यान व्यापार युद्धाचा धोका बळावला गेल्याची चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. 
 
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या घोषणेचा परिणाम हा जगभराच्या शेअर बाजारावर होत आहे. ९ एप्रिल रोजी अमेरिकेतील शेअर बाजार डाउ जोन्समध्ये ३००० अंकांची ऐतिहासिक वाढ झाली. अशातच जपानच्या बाजारपेठेत १० एप्रिल २०२५ मध्ये खुला होणार असून त्यात १० टक्क्यांनी करात वाढ होणार आहे.
 
भारतीय शेअर बाजारावर त्याचा परिणाम हा दिसला नाही असे मानले जात आहे, कारण १० एप्रिल रोजी महावीर जयंतीच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत शेअर बाजारावर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॉरिफ लागू केला. भारताने आपल्या रणनीतीचा वापर करत कोणतीही सूडाची कारवाई न करता त्यातून संवादाचा मार्ग स्वीकारला आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी भारताला दिलासा दिल्याचा परिणाम आता समोर आला आहे.
 
अशातच अमेरिकेच्या शेअर बाजाराबाबत सांगण्यात आले की, पहिल्यांदा ७.८७ टक्केवारी वाढ करण्यात आली तर एस अँड पी ५०० ९.५२ टक्क्यांनी वाढला. दरम्यान, आता डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत चीनला इशारा दिला आहे.
 
ट्रम्पचा चीनला इशारा 
 
सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ट्रम्प यांनी लिहिले की, "टॉरिफवर ९० दिवसांसाठी विराम देण्यात आला आहे. इतर देशांमध्ये परस्पर शुल्कात कपात करत १० % देण्यात आला होता. त्यानंतर हा निर्णय तत्काळ लागू करण्यात आला ज्यामुळे जागतिक पातळीवर शेअर बाजाारांप्रती सम्मान दिला गेला नाही. यामुळेच आता चीनक़डून १२५ % टॉरिफ कर आकारण्यात येईल. चीनला समजून घ्यावे लागेल की, अमेरिकेसोबत जागतिक पातळीवर असणारे देश त्यांचे शोषण करणार नाहीत," अशी पोस्ट त्यांनी केली आहे.