नागपूरात काँग्रेसला धक्का! तब्बल ९ नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

01 Apr 2025 14:12:52
 
Chandrashekhar Bawankule
 
नागपूर : नागपूर ग्रामीणमधील तब्बल ९ नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने नागपूरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत आणि भाजप नेते राजू पारवे यांच्या नेतृत्वात हा पक्षप्रवेश सोहळा पार पाडला.
 
यावेळी काँग्रेसचे ९ नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ३ नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. नागपूरातील रविभवन येथे कुही येथील काँग्रेसच्या अध्यक्षा हर्षा इंदूरकर, उपाध्यक्ष अमित ठवकर, नगरसेवक रुपेश मेश्राम, नगरसेवक मयूर तळेकर, नगरसेविका शारदाताई दूधपचारे तसेच उमरेड येथील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव जितेंद्र गिरडकर यांच्यासह काँग्रेसच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
 
हे वाचलंत का? -  पाथर्डी तालुक्यातील अकोला गावात ५४ मतदार बांग्लादेशी! कारवाईसाठी समिती गठित
 
राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांचे बिगुल वाजण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश महत्वाचा मानला जात आहे. दरम्यान, या पक्षप्रवेशामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला असून नागपूरात पक्षाला मोठे खिंडार पडले जात आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0