लखनऊ : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) रामपूर येथील शिवमंदिरात लाऊडस्पीकरवर भजन वाजवण्यावरून गोंधळ निर्माण झाला आहे. जमावाच्या रुपात आलेल्या कट्टरपंथी मुस्लिमांनी पुजारी प्रेमसिंग यांना मंदिराबाहेर काढण्यात आल्याचा गलिच्छ प्रकार घडला. तसेच त्यांना बेदम मारहाणही करण्यात आली आहे. तसेच यानंतर पुजाऱ्याला बेदम मारहाण करेन अशीही धमकी देण्यात आली. संबंधित प्रकरणी कट्टरपंथी अफसर अली नावाच्या कट्टरपंथींच्या पुढाकाराने जमावाने उघडपणे धमकी दिली की, जर लाऊडस्पीकर वाजवल्यास हिंदूंना गावातून हाकलून लावले जाईल आणि त्यांची मालमत्ताही जप्त केली जाईल.
या घटनेपासून गावात तणावजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी १२ आरोपींना अटकही करण्यात आली आहे. प्रेमसिंग हे तांड्यातील सिकंदराबाद गावातील शिव मंदिरात पुजारी आहेत. ते दररोज सकाळी आणि सायंकाळी आरतीच्या वेळी मंदिरात लाऊडस्पीकरवर भजप लावले जाते. तसेच किर्तनात ग्रामस्थही येतात.
दरम्यान, शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास भजन सुरू असताना त्यावेळी गावातील काही कट्टरपंथीयांनी मंदिरावर हल्ला केला. इस्रायल, तौफिक, भूरी, इक्बाल, नजरू, शैदा, शकील, मुन्सा अली, गुलनाझ, अनीस असे हल्लेखोरांची नावे आहेत. त्यावेळी त्यांनी पुजाऱ्याला मारहाण केली आणि त्याला मंदिरातून बाहेर ओढून नेण्यात आले होते.
अशातच ही घटना झाल्यानंतर गावातील काही लोक हे घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पुजाऱ्यांना सोडले. नंतर पुन्हा मोठ्या आवाजात लाऊडस्पीकर लावले तर त्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.
या घटनेदरम्यान, आरोपीने सांगितले की, गावप्रमुख हा कट्टरपंथी मुस्लिमच आहे. गावात हिंदूंची लोकसख्या ही फारच कमी आहे. म्हणूनच ते भयभीत झाले आहेत. रात्री गावकरी पुजाऱ्यासा घेऊन पोलीस ठाण्यात गेले असता, प्रेमसिंग यांनी तक्रार केली आणि त्यांच्या तक्रारीवरून आरोपीवर एफआरआय गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात आता १२ जणांना अटक करण्यात आली आहे.