"हड मी पाणी पिणार नाही....", राज ठाकरे यांनी उडवली गंगामातेची खिल्ली

09 Mar 2025 17:33:14
 
Raj Thackeray
 
पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महाकुंभातील गंगा मातेच्या केलेल्या वक्तव्यावरून त्यांना अनेक टीकांना सामोरे जावं लागत आहे. त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे राज ठाकरे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. जगभरातील ६० कोटींहून अधिक हिंदूंनी गंगेत डुबकी लावली. त्यावर आता राज ठाकरे यांनी गंगेत मिसळलेल्या हड मी पाणी पिणार नसल्याचे त्यांनी वक्तव्य केले आहे. ते पिंपरी चिंचवडमध्ये पक्षाच्या १९ व्या वर्धापन दिनानिमित्त उपस्थितांना संबोधित करत म्हणाले आहेत.
 
"म्हटलं गधड्यांनो पापं करता कशाला?"
 
सभागृहात राज ठाकरे यांनी एका बैठकीतला किस्सा सांगितला. त्यात काही जण बैठकीला उपस्थित होते. तेव्हा मुंबईत बैठक लावण्यात आली होती. ते सभेत म्हणाले की, मुंबईत बैठक होती, मुंबईतील शाखा अध्यक्ष, उपाध्यक्ष हजर राहिले नाहीत. त्यांची हजेरी घेण्यात आली. प्रत्येकाला विचारले असता प्रत्येकाने वेगवेगळी कारणं दिली आहेत. त्यावेळी पाच ते सहा जणांनी घरचे आजारी असल्याचे कारण दिले. तर काहींना कुंभाला गेल्याचे सांगितले होते. म्हटलं गधड्यांनो पापं करता कशाला? त्यानंतर अंघोळ केली का? असा प्रश्न केला, त्यावर सभागृहात हशा पिकला.
 
 
 
त्यावेळी बोलत असताना बाळा नांदगावरांबाबतही सांगितले. ते म्हणाले की, आमचे बाळा नांदगावकर कमंडलूमहून पाणी घेऊन आले होते. म्हटलं हड मी नाही पिणार, असे राज ठाकरे यांनी वक्तव्य केले आहे. त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत. तर राज्यातून आता त्यांच्यावर टीकाही होत आहेत. राज ठाकरे नेमकं कोणाच्या सांगण्यावरून बोलत आहेत? असे प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित केले जात आहेत.
 
Powered By Sangraha 9.0