"पुन्हा असे कृत्य करणार नाही...", गौरव आहुजाचा व्हिडिओद्वारे माफीनामा

    09-Mar-2025
Total Views |
 
Gaurav Ahuja
 
पुणे : पुणे शहरात ८ मार्च २०२५ रोजी गौरव आहुजा (Gaurav Ahuja) नावाच्या एका बड्या बापाच्या लेकाने शास्त्रीनगर येथे महामार्गावर असणाऱ्या सिग्नलवर लघुशंका केली. त्यानंतर त्याने भररस्त्यातच अश्लील चाळे केले होते. त्यावेळी त्याच्याजवळ बीएमडब्लू चार चाकी वाहन होते. त्यानंतर तो तिथून फरार झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, या घटनेनंतर त्याने झालेल्या घटनेप्रकरणी माफी मागितली आहे. त्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
 
त्याने केलेले कृत्य हे सीसीटीव्हीमध्ये कैद करण्यात आले आहेत. दरम्यान, तो मद्यधुंद असल्याची माहिती समोर येत आहे. त्याने केलेल्या कृत्यावर माफी मागितली आहे. तो एका व्हिडिओच्या माध्यमातून माफीनामा मागितला आहे. 
 
 
 
गौरवचा माफीनामा
 
माझ्यामुळे माझ्या कुटुंबातील कोणत्याही सदस्यांना त्रास होवू नये. मला एक संधी द्या, पुन्हा असे कृत्य करणार नाही. शिंदे साहेब आणि सरकारला विनंती करतो की, मला त्यांनी संधी द्यावी, असे म्हणत त्याने एका व्हिडिओच्या माध्यमातून माफी मागितली आहे, तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
 
त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच ९ मार्च रोजी सकाळी ७ . ५० मिनिटांनी तो पोलीस ठाण्यात स्वत:हून दाखल झाला. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, ही घटना घडल्यानंतर गौरवचे वडील मनोज आहुजा यांनी आपल्याच लेकावर संताप व्यक्त केला आहे. त्याने सिग्नलवर नाहीतर माझ्यावर लघुशंका केली असल्याचे ते म्हणाले आहेत.
 
दरम्यान, गौरववर अनेक गुन्हे दाखल आहेत. तसेच त्याच्या वडिलांवरही काही गुन्हे दाखल आहेत. गौरववर खंडणीप्रकरणात अनेरकदा तक्रारी दाखल केल्या गेल्या असल्याचे सांगण्यात येत आहे.