कामठी शहराचा सर्वागीण विकास करणार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

जनसंवाद कार्यक्रमाला उसळली नागरिकांची गर्दी

    09-Mar-2025
Total Views |

Chandrashekhar Bawankule
 
नागपूर : राज्याचे महसूल मंत्री आणि व नागपूर आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्याकडे जनसंवाद कार्यक्रमात समाजाच्या विविध क्षेत्रातील नागरिकांनी निवेदने सादर केली. विशेष म्हणजे दररोज निर्माण होणाऱ्या मुलभूत समस्यासह रोजगार आणि वैयक्तिक कामासंबंधी निवेदन देण्यात आली. संबंधित सर्व निवेदनाची दाखल घेत तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या.
 
कामठी मधील नागरिकांच्या समस्या आणि त्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी राज्याचे महसूल मंत्री आणि नागपूर व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा संघ मैदान, राम मंदिर कामठी या ठिकाणी जनसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटण्यासाठी कार्यक्रमस्थळी सकाळपासूनच नागरिकांनी गर्दी केली होती. विविध समाजातील युवक , महिला आणि ज्येष्ठ नागरिक जनसंवाद कार्यक्रमात निवेदन घेऊन सहभागी झाले होते. या वेळी एक- एक करत विविध समस्यांबाबत नागरिकांची निवेदन स्वीकारत चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्याशी संवाद साधला. प्रत्येक नागरिकांच्या निवेदनाची दखल घेत असताना त्यांना समस्याबाबत शाश्वत केले.
 
या वेळी कामठी शहरातील अतिक्रमण, पिण्याच्या पाण्याची समस्या रस्ते, कृषी,धार्मिक सांस्कृतिक, क्रीडा, सांस्कृतिक, म्हाडाची घरे आदी क्षेत्रांशी संबंधित निवेदने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सोपविण्यात आली. यावेळी ना. श्री बावनकुळे यांनी नागरिकांशी चर्चा केली व त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. अनेक लोक वैयक्तिक समस्यांची निवेदने घेऊन कार्यक्रमात दाखल झाले होते. नागरिकांच्या समस्या जाणून घेत समस्या ऑन द स्पॉट सोडवता याव्यात, हा उद्देश ठेवूनया प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते.यावेळी कामठी मध्ये उभारण्यात आलेल्या मॉलमध्ये उद्योगासाठी गाळे देण्यात आले. तर रमाई आवास योजनेअतर्गत ७० लाभार्थींना एक- एक लाख रुपयाच्या धनादेशाचे वाटप करण्यात आहे. तर काहीना मालकी हक्काचे पट्टे वाटप करण्यात आले. या वेळी माजी आमदार टेकचंद सावरकर, , जिल्हा सरचिटणीस अनिल निधान, रिंकेश चवरे, अजय अग्रवाल, उमेश रडके, राज हाडोती, संजय कनौजीयाआदी उपस्थित होते.
 
.जनसंवाद कार्यक्रमात समाजातील सर्व वर्गातील व सर्व वयोगटातील नागरिक आले होते. आजच्या जनसवांद कार्यक्रमाला दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांसह विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळही आले होते. विशेषतःविद्यार्थ्यांनी खेळासाठी मैदान उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली.
 
कामठी शहराला सुरक्षित शहर करण्यासोबत सर्वागीण विकास करायचा आहे. त्यासाठी सरकार म्हणून माझी जबाबदारी आहे पण तुमची मदत आणि सहकार्याची अपेक्षा आहे असे मत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे जनसंवाद कार्यक्रमात व्यक्त केले.
 
कामठी शहरातील जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी आणि मतदार संघातील नागरिकांशी संवाद साधण्यासाठी आयोजित जनसंवाद कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. मोठ्या प्रमाणात नागरिकांची निवेदन स्वीकारली. कामठी शहरात बरीच विकास कामे गेल्या पंधरा वर्षात केली असली तरी अजून मोठ्या प्रमाणात करायची आहे. कामठी शहराला सुरक्षित शहर करण्यासोबत तुमच्या मालमत्तेचे संरक्षण करायचे आहे. सर्वागीण विकास करायचा आहे. गेल्या पंधरा वर्षात प्रत्येक समाजासाठी काम केले आहे. विकास कामात कुठलीही तडजोड केली जाणार नाही. जी निवेदन स्वीकारण्यात आली ती सर्व निकाली काढण्यात येईल आणि येत्या पाच वर्षात शहराचा सर्वांगीण विकास करण्यात येणार असल्याचा निर्धार त्यांनी यावेळी केला.