( vidya kadam International Women day ) ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या संचालक विद्या प्रशांत कदम यांचा जन्म पुण्यात झाला. आईवडील दोघेही महाराष्ट्र शासन आरोग्य विभागात असल्याने आणि कुटुंबात एकुलती लेक असल्याने त्यांचे बालपण खेळत-बागडत पर्यटनाचा आनंद लुटत गेले. बालपणी उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये भारतभर तसेच सात ते आठ युरोपीय देश बघण्याचे भाग्य लाभले. पुण्याच्या सेंट जोसेफ हायस्कूल, कॉन्व्हेंट शाळेतून शालेय शिक्षण, फर्ग्युसन कॉलेजमधून ‘बी.एस.सी.’ झाल्यानंतर ‘टीसीआय’मध्ये पब्लिक रिलेशन ऑफिसर या पदावर काम केले.
1995 मध्ये लग्न होऊन ठाण्यात आल्यानंतर नोकरीसह गृहिणीची जबाबदारीही त्यांनी निगुतीने पार पाडली. पतीचा स्वतःचा ‘टूर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स’चा व्यवसाय असून विद्या यांचा एक मुलगा सिव्हिल इंजिनिअर व सासरे महसूल विभागाचे निवृत्त ‘क्लास वन ऑफिसर’आणि सासू गृहिणी असे सदाबहार कुटुंब आहे. मुलगा झाल्यानंतर काही वर्षांनी ‘टीसीआय’मधील नोकरी सोडून विद्या यांनी स्वतःचे कोचिंग क्लासेस सुरू केले.
सोसायटीच्या संचालक मंडळात अध्यक्ष, सचिव असे काम करीत असताना ‘हाऊसिंग फेडरेशन’च्या निवडणुकीच्या निमित्ताने फेडरेशनचे उपाध्यक्ष निंबा पाटील व संचालक जुवेकर यांच्याशी विद्या यांची ओळख झाली. दरम्यान, ठाण्यात भारतीय जनता पक्षाचे काम करीत असताना ‘हाऊसिंग फेडरेशन’चे अध्यक्ष सीताराम राणे यांच्याशी त्यांचा परिचय झाला. 2023 मध्ये पार पडलेल्या ‘हाऊसिंग फेडरेशन’च्या निवडणुकीत सीताराम राणे यांच्या नेतृत्वात निवड होऊन प्रथमच त्या संचालक बनल्या. तेव्हापासून हाऊसिंग फेडरेशनसोबत त्यांची वाटचाल सुरू असून दोन वर्षांत खूप काही शिकायला मिळाले व अजून खूप काही शिकायचे असल्याचे त्या सांगतात.
अंगी विविध कलागुण असलेल्या विद्या नृत्य आणि नाटकांमध्येही काम करतात. महिला सक्षमीकरणाच्या कामात पुढाकार घेऊन महिलांना मदत तसेच अनेक सरकारमान्य अभ्यासक्रम मोफत उपलब्ध करून दिले आहेत. भविष्यात वृद्धांसाठी काम करण्याची तसेच गोवंश व गोमातांकरिता गोशाळा उभारण्याचा विद्या यांचा मानस आहे. महिलांनी सक्षम होऊन निर्भीडपणे चांगली कामे करीत राहावे, असा संदेश विद्या यांनी महिलावर्गाला दिला आहे.
(अधिक माहितीसाठी संपर्क - 9920118363)