टाटा कंपनीकडून विद्युत वाहनांसाठी ग्राहकांना मार्च ऑफर

विद्युत वाहनांच्या खरेदीवर १ लाखांपर्यंतची सुट

    08-Mar-2025
Total Views |
 tat
 
 
मुंबई : टाटा कंपनीकडून विद्युत वाहनांसंदर्भात एक मोठी खुशखबर देण्यात येत आहे. या विद्युत वाहनांच्या खरेदीवर टाटा कंपनीकडून १ लाखांपर्यंत सुट देण्यात येणार आहे. खास मार्च महिन्यासाठी ही ऑफर देण्यात आली आहे. टाटा कंपनीच्या सर्वच विद्युत गाड्यांवर ही सवलत देण्यात येणार आहे. या गाड्यांमध्ये कर्व्ह इव्ही, पंच इव्ही, नेक्सन इव्ही, टाटा टिऍगो इव्ही या गाड्यांचा समावेश होतो.
 
या गाड्यांमध्ये वेगवेगळ्या गाड्यांमध्ये वेगवेगळ्या स्वरुपात सुट मिळणार आहे. यात पहिला क्रमांक टाटा कर्व्ह इव्हीचा या गाडीवर ७० हजारांपर्यंतची सुट देण्यात येणार आहे. नुकतीच टाटा कंपनीकडून घोषणा करण्यात आली आहे की या कर्व्ह इव्हीचे नवीन मॉडेल टाटा कर्व्ह इव्ही डार्क एडिशन या २०२४ मध्ये होणाऱ्या आयपीएलच्या आधी लाँच होणार असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.
 
टाटा पंच इव्ही या गाडीवर ९० हजारांपर्यंत सुट देण्यात येणार आहे. या गाडीची अजून एक विशेष बाब म्हणजे या दिल्या जाणाऱ्या सवलतीमध्ये २० हजारांचा ग्रीन बोनसचा समावेश आहे. टाटा नेक्सन इव्हीवर ४० हजारांपर्यंत सवलत देण्यात येणार आहे. या गाडीच्या बाबतीत महत्वाची गोष्ट म्हणजे या गाडीवर असलेली सवलत ही मार्च २०२५ पर्यंतच मिळणार आहे. टाटा टिऍगो ही यामालिकेतील सर्वात महत्वाची गाडी आहे. कारण या गाडीवर ८५ हजारांचा थेट बोनस मिळतो आहे. यावर अजून एक विशेष म्हणजे या गाडीवर १५ हजारांचा ग्रीन बोनस मिळणार आहे. भारतात सध्या विद्युत वाहनांचे युग येत आहे. त्यामुळे आता वाहन निर्मिती कंपन्यांकडून अशा अनेक सवलती देण्यात येत आहेत.