तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण भारतात होणारच!

    08-Mar-2025
Total Views |

Tahawwur Rana
 
नवी दिल्ली : ( Tahawwur Rana will be extradited to India ) २००८ च्या मुंबई हल्ल्यातील दोषी तहव्वूर राणा याचे भारतात प्रत्यार्पण थांबवण्याची विनंती अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने गुरुवार, दि. ६ मार्च रोजी फेटाळून लावली आहे.
 
तहव्वूरने आपणास भारतात पाठवू नये, म्हणून याचिका दाखल केली होती. राणाने याचिकेत म्हटले होते की, तो अनेक आजारांनी ग्रस्त आहे, जर त्याचे प्रत्यार्पण थांबवले नाही, तर तो भारतात टिकू शकणार नाही.
 
त्यामुळे त्याच्या प्रत्यार्पणावर आपत्कालीन स्थगिती आणली पाहिजे. तथापि, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश एलेना कागन यांनी हा युक्तिवाद स्वीकारला नाही आणि याचिका फेटाळून लावली आहे.