सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश! मंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न
08-Mar-2025
Total Views |
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी शनिवार, ८ मार्च रोजी मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले.
यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, जिल्हा संघटक महेश सारंग, वैभवाडी भाजपा मंडळ अध्यक्ष सुधीर नकाशे, जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे, नासीर काझी, भालचंद्र साठे, दिगंबर पाटील, सज्जनकाका रावराणे, प्राची तावडे, नगराध्यक्ष श्रद्धा रावराणे, रविंद्र मडगावकर, प्रमोद गावडे, चंद्रकांत जाधव, महेश धुरी इत्यादी भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
शरद पवार गटाचे ओबीसी सेल तालुकाध्यक्ष सिद्धेश तेंडूलकर, उबाठा गटाचे खांबाळे गावचे माजी उपसरपंच, युवा विभाग प्रमुख गणेश पवार, उबाठा गटाचे उपविभाग प्रमुख जयेश पवार तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तालुका सचिव गणेश पवार, उबाठा सेनेचे युवा सेना जिल्हा चिटणीस तथा शिवसेना वक्ते स्वप्निल धुरी, उबाठा गटाचे सोनाळी सरपंच भीमराव भोसले, ग्रामपंचायत सदस्य बाळकृष्ण बोभाटे यांच्यासह तिथवली ग्रामपंचायतीचे सदस्य अशा प्रमुख पदाधिकाऱ्यांसह असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.