पुणे (Pune News) : पुणे शहरातील शास्त्रीनगर असलेल्या गजबजलेल्या भागात मद्यधुंद अवस्थेत असलेल्या रस्त्याच्या मधोमध असलेल्या एका सिग्नलजवळ अश्लील चाळे केल्याची घटना समोर आली आहे. या कृत्याने संबंधित युवकाच्या वडिलांनी आपल्या मुलाची लाज काढली आहे. हा युवक बीएमडब्लू या चारचाकी महागड्या वाहनातून प्रवास करत असताना त्याने हे अश्लील कृत्य केले आहे. अश्लील कृत्य करणाऱ्या युवकाचे नाव गौरव अहुजा असून युवकाच्या वडिलांनी आपल्याच मुलाला कडक शब्दात सुनावले आहे. ही घटना जागतिक महिला दिना दिवशीच ८ मार्च रोजी घडली.
MH12 RF 8419 क्रमांकाच्या बीएमडब्लू चारचाकी वाहनचालक युवकाने रस्त्यावर उतरत लघुशंका केली. तसेच घटनास्थळी उपस्थितांपैकी असे कृत्य केल्याने युवकाला सुनावले. त्यावरून त्याने अश्लील चाळे करण्यास सुरूवात केली. या हैवानी कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावरून आता त्याचे वडील मनोज अहुजा याने मुलगा गौरव अहुजाला सुनावले आहे. ते म्हणाले की, त्याने सिग्नलवर नाहीतर माझ्या तोंडावर लघुशंका केली आहे. दरम्यान, गौरव अहुजा हा अद्यापही फरार असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
अश्लील कृत्य करणाऱ्या युवकाच्या वडिलांनी नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, "माझा मुलगा सिग्नलवर नाहीतर त्याने माझ्यावर लघुशंका केली आहे. माझा मुलगा असल्याची मला लाज वाटते. व्हिडिओत असलेली गाडी ही माझ्या नावावर आहे. मला पोलिसांनी बोलावलं होतं आणि माझी चौकशी करण्यात आली. माझ्यावर जी काही कारवाई करण्यात आली आहे ती मला मान्य आहे. आम्ही सकाळपासून त्याला फोनद्वारे संपर्क करत आहोत पण त्याचा फोन बंद आहे. आम्ही त्याचा शोध घेत आहोत," असे ते म्हणाले आहेत.