आयटी रिटर्न्स भरणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, याच बँकांमधून करता येणार ई- फायलिंग

३१ मार्च २०२५ पर्यंत आयटी रिटर्न्स भरण्याची शेवटची मुभा

    08-Mar-2025
Total Views |
income
 
नवी दिल्ली : मार्च महिना सुरु झाल्यापासून आयकर भरणाऱ्यांची लगबग सुरु होते. अशातच आयकर विभागाकडून आयकर भरणाऱ्यांसाठी महत्वाची सुधारणा करण्यात आली आहे. ऑनलाइन आयकर भरणा करणाऱ्यांसाठी असलेली बँकांची यादी सुधारित करण्यात आली आहे. या यादीत ३० नव्या बँकांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आयकर भरणाऱ्यांना आता जास्त पर्याय उपलब्ध होतील आणि त्यातून आयकर भरणे सुलभ होईल.
 
आतापर्यंत ऑनलाइन आयकर भरणा प्रक्रिया काही राष्ट्रीयकृत बँकामध्येच उपलब्ध होती. आता पर्यंत बंधन बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, आयसीआयसीआय, एसबीआय, पंजाब नॅशनल बँक, डीसीबी बँक, एचडीएफसी बँक यांसारख्या राष्ट्रीयकृत आणि खासगी क्षेत्रातील महत्वाच्या बँकामध्ये ही ऑनलाइन आयकर भरण्याची प्रक्रिया उपलब्ध आहे. आता त्यात अजून महत्वाच्या ३० बँकांमध्ये ही सुविधा आता उपलब्ध होणार आहे.
 
जर आपले खाते असलेली बँक या यादीतील बँकांमध्ये नसेल तर आपल्याला एनईएफटी, आरटीजीएस, या सुविधांचा उपयोग करुन आपण आयकर भरणा करु शकता. सध्या बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, एसबीआय, एचडीएफसी, फेडरल बँक या बँकांमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे आता आयकर भरणा करणे अधिक सोपे होणार आहे. यातील सुचनांमध्ये होणाऱ्या बदलांसाठी सातत्याने आयकर विभागाचे संकेतस्थळ बघत राहणे आवश्यक आहे.
 
आयकर विभागाकडून ई- चलन भरण्यासाठी अजून काही पर्याय दिले गेले आहेत. त्यात नेट बँकिंग, डेबिट कार्ड, बँकेत भरणा करण्याची सुविधा, आरटीजीएस,एनईएफटी, तसेच आता युपीआय द्वारेही आपल्याला आयकर भरणा करणे शक्य होणार आहे.