नवी दिल्ली : ( randhir jaiswal ) “लंडनमध्ये खलिस्तान समर्थकांनी परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांच्या सुरक्षेचे उल्लंघन केल्याबद्दल भारताने ब्रिटनला अतिशय कडक शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. ब्रिटनमध्ये फुटीरतावादी शक्तींना मुक्त परवाना देण्यात आल्याचे दिसते,” असा टोला लगावला आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, “या घटनेमागे फुटीरतावादी आणि अतिरेकी आहेत, हे अगदी स्पष्ट आहे. या घटनेमागे एक संदर्भ आहे,” असे त्यांनी सांगितले.
या घटनेवरून असे दिसून येते की, ब्रिटनमध्ये फुटीरतावादी शक्तींना परवाना देण्यात आला आहे. असे दिसते की, कदाचित तिथले लोक या घटनेला गांभीर्याने घेत नाहीत किंवा त्यांना त्याचा काही फरक पडत नाही. कदाचित म्हणूनच त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.