गुजरात काँग्रेसचे अर्धे लोक भाजपचे – राहुल गांधी यांचा दावा

    08-Mar-2025
Total Views |
 
Half of Gujarat Congress members are BJP members Rahul Gandhi claims
 
नवी दिल्ली: ( Rahul Gandhi )  गुजरात काँग्रेसमध्ये स्पष्टपणे दोन गट पडलेले आहेत. त्यातील एक गट तर भाजपमध्येच सामील झाला आहे आहे, असा दावा काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शनिवारी अहमदाबाद येथे केला आहे.
 
हरियाणा, महाराष्ट्र आणि दिल्लीमधील काँग्रेसच्या अपयशानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आता गुजरातवर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यासाठी ते दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर होते, यावेळी त्यांनी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. गुजरात काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले. त्याचवेळी गुजरात काँग्रेसचेच नेते आणि कार्यकर्त्यांनाही त्यांनी लक्ष्य केले.
 
राहुल गांधी म्हणाले, गुजरातचे नेतृत्व, गुजरातचे कार्यकर्ते, गुजरातचे जिल्हाध्यक्ष, ब्लॉक अध्यक्ष यांच्यामध्ये दोन प्रकार आहेत. त्यातील एक भाग सर्वसामान्य लोकांसोबत उभा राहतो, लोकांसाठी लढतो, लोकांचा आदर करतो आणि त्याच्या हृदयात काँग्रेस पक्षाची विचारधारा आहे. मात्र, दुसरा गट पूर्णपणे वेगळा आहे. दुसरा गट लोकांपासून तुटलेला आहे, दूर बसतो, लोकांचा आदर करत नाही आणि त्यापैकी अर्धे भाजपमध्ये सामील झाले आहेत, जोपर्यंत आपण या दोघांना स्पष्टपणे वेगळे करत नाही, तोपर्यंत गुजरातचे लोक आपल्यावर विश्वास ठेवू शकत नाहीत, असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.