महाराष्ट्राच्या लेकीचा जगभरात डंका!

07 Mar 2025 15:07:54

mh1

मुंबई : महाराष्ट्राची भूमी म्हणजे रत्नांची खाण आहे असे म्हटले जाते. आपल्या कलागुणांनी या मराठी संस्कृचीचा डंका त्यांनी जगभरात वाजवला. अशातच आता महाराष्ट्राची लेक सिद्धी कापशिकर हीने तब्बल १० तास हार्मोनियम वादन करत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समधअये आपले नाव सुवर्णअक्षरांनी नोंदवले आहे. इंगलंड मधील हॅरो येथे हा विश्वविक्रम तिने केला.

मूळची पुण्याची असलेली सिद्धी हीचे बालपण निगडी येथे गेले. लहानपणापासूनच संगीतासोबत तिचे ऋणुनाबंध जुळले. आपल्या आईकडून संगीताचे धडे गिरवत, ती विशारद परीक्षा उत्तीर्ण झाली. विश्वकर्मा विद्यापीठातून पदवीचे शिक्षण घेत, पदव्युत्तर शिक्षणासाठी त्या लंडन इथल्या वेस्टमिन्स्टर विद्यापीठात दाखल झाला. सध्या लंडन इथल्या हाँगकाँग आणि शांघाय बँकिंग कॉर्पोरेशन इथे त्या ऑडिओ व्हिडीओ इंजिनीयर म्हणून कार्यरत आहेत. सिद्धीने तब्बल १० तास २३ मिनीटे आणि २२ सेकंद हार्मोनियम वादन ज्यामध्ये तिने ७५ राग सादर केले. यामध्ये गीत रामायण, भजन, अभंग, याच सोबत हिंदी चित्रपटातील गीतांचा सुद्धा समावेश आहे. आपल्या या विक्रमाबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की एक भारतीय आणि मराठी माणूस म्हणून मला माझ्या सादरीकरणाचा अभिमान आहे. माझे हे सादरीकरण मी माझ्या देशाला आणि या देशाच्या शास्त्रीय संगीताच्या समृद्ध वारश्याला अर्पण करत आहे.

Powered By Sangraha 9.0