ठाणे महापालिकेचा ‘अर्थसंकल्प’ आज सादर होणार

07 Mar 2025 14:52:31

Thane Municipal Corporation Budget
 
ठाणे:  ( Thane Municipal Corporation Budget ) ठाणे महापालिकेचा २०२५-२६ चा अर्थसंकल्प शुक्रवार, दि. ७ मार्च रोजी सादर होणार आहे. मात्र, तिजोरीत पुरेशी गंगाजळी नसल्याने ’बदलते ठाणे’ साकारण्यासाठी ठाणे महापालिकेची मदार शासननिधीवर असणार आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव विशेष पत्रकार परिषद घेऊन अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
 
मागील वर्षी ठाणे महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अभिजित बांगर यांनी २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा ५ हजार, २५ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता. यात महिला सक्षमीकरणासह आरोग्य व्यवस्था मजबूत करण्यावर भर देण्यात आला होता. उत्पन्न वाढविण्यावर भर, खर्चात शिस्त, कल्याणकारी योजना, कामांचा दर्जा उत्तम राहण्यावर भर यांसारख्या योजनांची घोषणा करण्यात आली.
 
विद्यमान पालिका आयुक्त सौरभ राव यंदाच्या अर्थसंकल्पात कोणती घोषणा करणार, याची उत्सुकता ठाणेकरांना लागली आहे. ठाणे महापालिकेने दायित्वाचा डोंगर कमी केला असला, तरी सध्याच्या घडीला तब्बल १ हजार, २०० कोटींचे ओझे पालिकेवर आहे. ही देणी फेडण्यासाठी ठाणे महापालिकेला आणखी दोन वर्षांचा कालावधी लागण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे पालिकेची मदार शासनाच्या निधीवर असणार आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0