संभलमध्ये होळी दिवशी जुम्माला बाहेर पडू नका, पोलीस प्रशासनाचा सल्ला
07-Mar-2025
Total Views |
लखनऊ : उत्तर प्रदेशात संभलमध्ये असणाऱ्या स्थानिक मुस्लिमांना एक दिवस म्हणजेच हिंदूंच्या होळी सणादिवशी बाहेर पडू नका, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. त्यावरून आता सपा नेत्याने उत्तर प्रदेशात पुन्हा सत्तेत आल्यानंतर सीओ चौधरीला तुरूंगात टाकणार असल्याचा दावा गुरूवारी ६ मार्च २०२५ रोजी केला आहे. १४ मार्च रोजी जुम्मा अदा करू नये असे आवाहन करण्यात आले आणि होळीदिवशी बाहेर न पडण्याचे पोलीस प्रशासनाने सांगितल्याने सपा नेते राम गोपाल यादव यांना मिरची लागल्याचे दिसून आले आहे.
समाजवादी नेत्याने गेल्या वर्षी संभलमध्ये हिंसाचार भडकवल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. त्यावर ते म्हणाले की, स्थानिक प्रशासन पोलीस अनुप चौधरी यांनी दंगल भडकवली आहे. गोली चलाओ असे म्हणणारे सीओ होते. त्यांच्याकडून आता काय अपेक्षा करावी? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. जेव्हा व्यवस्था बदलेल तेव्हा असे लोक तुरूंगात असतील, असे सीओ चौधरी यांनी मुस्लिमांना होळी दिवशी घराबाहेर पडू नये आणि घराबाहेर जुम्म नमाज अदा करू असे आवाहन केल्याचे यादव म्हणाले.
दरम्यान, पोलीस प्रशासनात असलेल्या अनुज चौधरी यांनी हिंदू आणि मुस्लिमांना उत्सवादरम्यान शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी मुस्लिम समुदायातील लोकांना रंग आणि उत्सव टाळायचे असतील तर होळीनिमित्त एक दिवस बाहेर पडणे टाळण्याचा सल्ला देण्यात आला. त्यांनी हिंदूंना त्यांच्या इच्छेविरूद्ध लोकांवर रंग फेकू नये असे आवाहनही केले.
या वर्षी होळी १४ मार्च रोजी साजरी केली जाणार आहे. तोच दिवस शुक्रवार असून त्याच दिवशी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने जुम्माची नमाज अदा करणार आहेत. होळी आणि जुम्माच्या नमाजामुळे योगायोग लक्षात घेता, पोलिसांनी जुम्मा अदा न करण्याचे आवाहन केले आहे. जर होळीमुळे त्यांचा धर्म भ्रष्ट होईल असे ज्यांना वाटत असेल त्यांनी त्या दिवशी घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला. जर बाहेर पडायचे असेल तर त्याने रंगामुळे आपल्या भावना दुखवून घेऊ नये, असे प्रतिपादन सीओने माध्यमांशी बोलताना सांगितले.