नायर रुग्णालयात जागतिक महिला दिनानिमित्त केवळ महिलांसाठी रक्तदान शिबीर

07 Mar 2025 19:49:52
 
nair
 
 
मुंबई : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मुंबईतील नायर रुग्णालयात केवळ महिलांसाठी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या रक्तदान सोहळ्याचे विशेष म्हणजे या रक्तदान शिबिरात केवळ महिलाच रक्तदात्यांना रक्तदान करण्याची अनुमती मिळते. येथील सर्व स्वयंसेवीका सुध्दा महिलाच असतात. महिलांच्या उत्साही वातावरणात केवळ महिलाच रक्तदानासाठी रांगा लावतात व रक्तदान करतात, हा क्षण अनुभवण्यासारखा असतो. रक्तदान शिबिरात येणाऱ्या प्रत्येक महिलेचा सन्मान येथे केला जातो.
जीवनदाता महिला परिवार गेली पाच वर्ष सतत केवळ महिलांसाठीच रक्तदान शिबिराचे आयोजन करत असते. हे रक्तदान शिबिर नायर हॉस्पिटल, मुंबई सेंटल येथे सकाळी नऊ ते दुपारी चार या वेळेत होणार आहे. महिलांनी मोठ्या संख्येने या शिबिरात उपस्थित राहून, रक्तदान करण्यासाठी आवर्जून यावे. असे आवाहन जीवनदाता महिला परिवाराच्या वतीने करण्यात आलेले आहे.
 
अधिक माहितीसाठी संपर्क
सौ. वीणा आमडोसकर – 9004236036
सौ जान्हवी नाईक - 7039475312
Powered By Sangraha 9.0