ॲड.आशिष शेलार यांची क्रिकेट काउन्सिल डायरेक्टर बोर्डात नियुक्ती
बीसीसीआयची मोठी घोषणा
07-Mar-2025
Total Views |
मुंबई : राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतीक कार्य मंत्री अॅड आशिष शेलार (Ashish Shelar) आणि कॉंग्रेस नेते राजीव शुक्ला यांची आज एशियन क्रिकेट कौंसिलच्या (एसीसी) च्या डायरेक्टर बोर्डात सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. एशियन क्रिकेट बोर्डात जाण्याचा महाराष्ट्राचे सुपुत्र शेलार यांना बहूमान मिळाला आहे.
आशिया खंडातील क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी स्थापन झालेल्या एशियन क्रिकेट कौंसिलमध्ये भारतासह बांग्लादेश, मलेशिया, सिंगापूर, श्रीलंका या देशांच्या पुढाकार होता. आता या कौंसिलमध्ये आता अफगानीस्तान, युएई, नेपाळ, ओमान, मलेशिया, जपान, इरान, चिनसह एकुण 30 देशांचे सदस्यांचा यामध्ये समावेश आहे.
नविन खेळाडू तयार करणे, त्यांना प्रशिक्षण देणे, पंचांना प्रशिक्षण देणे, एशियाई क्रिकेटमध्ये वाढ करणे तसेच 19 वर्षाखालील एशिया कप, महिला एशिया कप, पुरुष एशिया कप यारखे असे 13 हून अधिक आंतराष्ट्रीय स्तराच्या क्रिकेट टूर्नामेंट या कौंसिलमार्फत घेतल्या जातात. त्यामुळे या कौंसिलचे आंतराष्ट्रीय पातळीवर महत्व वाढले आहे.
या कौंसिलच्या डायरेक्टर बोर्डात आज अॅड आशिष शेलार यांची निुयक्ती करण्यात आल्याची घोषणा बीसीआयने केली आहे. आशिष शेलार यांनी यापुर्वी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष, अध्यक्ष आणि बीसीसीआयचे खजिदान म्हणूनही काम केले आहे. महाराष्ट्र राज्याच्या मंत्री पदावर नियुक्ती झाल्यानंतर लोढा कमिटीच्या शिफारशीनुसार त्यांनी बीसीसीआयच्या खजिनदार पदाचा राजिनामा दिला होता.
मध्यवर्गीय सामान्य कुटूंबातून लहानाचे मोठे झालेल्या शेलार यांचे क्रिकेट प्रेम आणि खेळाडूंसाठीची तळमळ मोठी असून त्यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून काम करताना खेळाडूंसाठी चांगल्या सुविधा मिळाव्यात म्हणून काम केले होते.