पुढचा महाकुंभ हरिद्वारात? गंगा कॉरिडॉरच्या बांधकामाला वेग

    07-Mar-2025
Total Views |

Haridwar-Rishikesh Ganga Corridor

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Ganga Corridor News)
प्रयागराज येथे संपन्न झालेल्या महाकुंभनंतर अनेकांना ओढ आहे ती हरिद्वार येथे २०२७ मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याची. त्यानिमित्ताने उत्तराखंड सरकार आतापासूनच तयारीला लागले आहे. हरिद्वार आणि ऋषिकेशमध्ये गंगा कॉरिडॉर बांधण्याचे काम वेगाने सुरू आहे. कुंभमेळा ऐतिहासिक आणि सुव्यवस्थित करण्यासाठी सरकार विशेष योजनांवर काम करत असल्याचे उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सांगितले. उत्तराखंड सरकारच्या प्रधान सचिव आर मीनाक्षी सुंदरम यांच्या उपस्थितीत गंगा कॉरिडॉरच्या संदर्भात नुकतीच एक बैठक संपन्न झाली. यावेळी कुंभ २०२७ पूर्वी गंगा शहराचा विस्तार आणि पुनर्बांधणी करणार असल्याचे मत सरकारने स्पष्टपणे व्यक्त केले.

हे वाचलंत का? : आधी अजान कोणाची? वादाचे रुपांतर तुफान हाणामारीत

मीनाक्षी सुंदरम यांनी बैठकीत असे सांगितले की, येत्या सात-आठ वर्षांत गंगा कॉरिडॉरचे काम येणाऱ्या भाविकांसाठी सुरु राहील, जे जे २०३३ च्या महाकुंभासाठी हरिद्वारला तयार करेल. कॉरिडॉरच्या संदर्भात कोणत्याही प्रकारची मोडतोड करण्याची योजना नाही. पहिल्या टप्प्यात हरकी पायडीजवळील महापालिकेचे जान्हवी मार्केट, हरिद्वार बसस्थानक स्थानांतरित करण्याची योजना आहे. यामध्येही ज्या दुकानांचे मालक व भाडेकरू काढले जातील त्यांना इतर ठिकाणी दुकाने दिली जातील.

त्याचबरोबर बैठकीचा मुख्य उद्देश कॉरिडॉरबाबत पसरलेला संभ्रम दूर करणे हा देखील होता. कॉरिडॉरच्या प्रस्तावित ले-आऊटमध्ये कोणत्याही प्रकारची मोडतोड करण्याची योजना नसल्याने हरिद्वारमधील व्यापारी आणि संबंधितांनी घाबरून जाण्याची गरज नसल्याचे सरकारने सांगितले. केवळ महापालिकेचे जान्हवी मार्केट व बसस्थानक स्थलांतरित करण्याचे आराखड्यातील मुख्य काम आहे. ज्यामध्ये बाधित भाडेकरू आणि दुकानमालकांना सध्याच्या बसस्थानकाजवळ बांधण्यात येणाऱ्या संकुलात दुकाने देण्यात येणार आहेत.