स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न द्या ! आमदार संजय उपाध्याय

    07-Mar-2025
Total Views | 12

MLA Sanjay Upadhyay on Swatantryaveer Savarkar
 
मुंबई : (MLA Sanjay Upadhyay on Swatantryaveer Savarkar ) भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील क्रांतिकारकांचे मुकुटमणी, द्रष्टे समाजसुधारक, प्रखर राष्ट्रभक्त स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना 'भारतरत्न' देऊन सन्मानित करावे, अशी मागणी बोरीवलीचे भाजप आमदार संजय उपाध्याय यांनी गुरुवार, दि. ६ मार्च रोजी विधानसभेत केली.
 
विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत भाग घेताना संजय उपाध्याय यांनी विविध मुद्द्यांकडे सरकारचे लक्ष वेधले. आपल्या पहिल्याच भाषणात उपाध्याय यांनी प्रभावीपणे आपली मते व्यक्त केली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अद्याप भारत सरकारने 'भारतरत्न' दिला नाही, याबद्दल खेद व्यक्त करत राज्य शासनाकडून यासाठी प्रयत्न करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली.
 
उपाध्याय यांनी पुढे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याची आठवण शासनाला करून दिली. देशात कोणत्याही आपत्तीच्या वेळी पुढे येऊन मदत करणाऱ्या आणि कुठेही त्याची प्रसिध्द्धी न मिळवणाऱ्या 'आरएसएस'चे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. यानिमित्त 'आरएसएस' या महान संस्थेचा राज्य शासनाने गौरव करावा, अशी मागणीही उपाध्याय यांनी फडणवीस सरकारकडे केली.
 
दिव्यांगांसाठी उठवला आवाज
 
दिव्यांग विद्यार्थ्यांच्या व्यथाही आ. संजय उपाध्याय यांनी शासन दरबारी मांडल्या. दिव्यांग विद्यार्थ्यांना शासन स्तरावर ओळखपत्र मिळवण्यासाठी खेटे मारावे लागतात. याची दखल घेऊन शासनाने दिव्यांग शाळेत किंवा त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्थांकडे जावून ओळखपत्रे वितरित करावे आणि त्यांना दिलासा द्यावा, अशी तिसरी महत्त्वाची मागणी उपाध्याय यांनी विधानसभेत केली.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
गिरीश महाजन यांच्यावर आरोप करता, हे योग्य नाही - चंद्रशेखर बावनकुळे यांचा एकनाथ खडसे यांना सल्ला

गिरीश महाजन यांच्यावर आरोप करता, हे योग्य नाही - चंद्रशेखर बावनकुळे यांचा एकनाथ खडसे यांना सल्ला

राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याबाबत एकनाथ खडसेंनी केलेले वक्तव्य हे त्यांचं टार्गेटिंग असून त्यांच्या प्रतिमेला गालबोट लावण्याचा प्रयत्न आहे. फक्त संबंध असल्याचा अर्थ हा गुन्हा केला असे होत नाही. माझेही अनेकांसोबत संबंध आहेत, पण त्याचा अर्थ मी काही गैर केले असे होत नाही. माझा खडसेंना सल्ला आहे,तुम्ही सतत गिरीश महाजन यांच्यावर आरोप करता, हे योग्य नसल्याचे मत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121