उत्तराखंडमध्ये 500 अनधिकृत मदरसे

07 Mar 2025 13:28:12

500 unauthorized madrasas in Uttarakhand
 
 
नवी दिल्ली: ( 500 unauthorized madrasas in Uttarakhand ) उत्तराखंडमधील बेकायदेशीर मदरशांवर प्रशासनाने कारवाई अधिक तीव्र केली आहे. आतापर्यंत एकट्या देहरादूनमध्ये 11 बेकायदेशीर मदरसे सील करण्यात आले आहेत. संपूर्ण राज्यात 500 हून अधिक मदरशांची ओळख पटवण्यात आली आहे, ज्यांच्यावर कारवाई करायची आहे.
  
उत्तराखंडमध्ये ही कारवाई केवळ बेकायदेशीर मदरशांवर केली जात आहे. जेव्हा त्यांना चौकशीदरम्यान संधी देण्यात आली, तेव्हा त्यांच्याकडे नोंदणीची कागदपत्रे आढळली नाहीत. मदरसे सील करण्याचा आदेश दि. 28 फेब्रुवारी रोजी देण्यात आला. यानंतर, मान्यता मिळविण्यासाठी ‘उत्तराखंड मदरसा बोर्डा’कडे सुमारे 88 अर्ज आले. बोर्डाने आतापर्यंत यांपैकी 51 मदरशांना मान्यता दिली आहे.
 
देहरादूनचे जिल्हा दंडाधिकारी सविन बन्सल म्हणाले की, “देहरादून तहसीलमध्ये 16 नोंदणीकृत नसलेले मदरसे आढळले, तर विकासनगरमध्ये 34, डोईवाला येथे सहा आणि कलसी येथे एक मदरसा अनधिकृत आढळले. तपासादरम्यान, या मदरशांमध्ये नोंदणीशी संबंधित कोणतीही कागदपत्रे आढळली नाहीत. यानंतर, प्रशासनाने या मदरशांना सील करण्यासाठी संयुक्त पथक तयार केले. या पथकात जिल्हा प्रशासन, पोलिसांसह अल्पसंख्याक आयोग आणि ‘मदरसा बोर्डा’चे अधिकारी होते.
 
उत्तराखंड सरकारच्यानिर्णयाचे स्वागत
 
उत्तराखंड सरकारचे ‘विश्व हिंदू परिषद’ स्वागत करते. अवैध मदरसे राष्ट्रसुरक्षेच्यादृष्टीनेसुद्धा धोकादायकच आहेत. त्यामुळे अशी कारवाई ही इतर राज्यांमध्येही होणे तितकेच महत्त्वाचे आहे, जेणेकरून राष्ट्रविरोधी होणार्‍या गतिविधींना निश्चितच आळा बसेल.
 
- श्रीराज नायर
राष्ट्रीय प्रवक्ते, विश्व हिंदू परिषद
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0