मुंबई : (Mumbai Bike Taxi) मुंबईमध्ये बाईक टॅक्सीला परिवहन मंत्रालयाकडून मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे मुंबईमधील रस्त्यांवर आता बाईक टॅक्सी धावणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा हा मोठा निर्णय मानला जात आहे. या निर्णयामुळे मुंबईतील वाहतूक कोंडीतून मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया
यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महायुती सरकारच्या काळात राज्यातील तरुणतरुणींना रोजगार मिळावा आणि जे प्रवासी आहेत त्यांची प्रवासदरम्यान होणारा जो खर्च आहे तो कमी व्हावा यासाठी देशातील २२ राज्यात बाईक टॅक्सी सुरु आहेत. राज्य शासनाने सुद्धा तो निर्णय घेण्याचे ठरवले , त्या माध्यमातून ती प्रक्रिया सुरु आहे. याच महिन्यात याबाबत अधिकृत घोषणा केली जाईल, अशी माहिती मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.
मुंबईत दिवसेंदिवस प्रवाशांची संख्या वाढत असून त्या तुलनेत सध्या उपलब्ध असलेली वाहतुकीची साधने अपुरी पडत असल्याने बाईक टॅक्सीला परवानगी देण्यात आली आहे. बाईक टॅक्सीसाठी १ किलोमीटरसाठी ३ रुपयांचा दर ठरल्याची माहिती आहे. ही सेवा एप्रिल २०२५ मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे.