बीड : (Beed Case Update) बीडच्या संतोष देशमुख ह्त्याप्रकरणात (Santosh Deshmukh Case) दि. २७ फेब्रुवारी रोजी सीआयडीकडून १८०० पानांचे दोषारोप पत्र बीड सत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते. या आरोपपत्रात १८४ साक्षीदारांचे जबाब आणि ६६ सबळ पुरावे देण्यात आले आहेत. यापैकीच मोकारपंती या व्हॅाट्सअॅप ग्रुपच्या चार सदस्यांनी फरार आरोपी कृष्णा आंधळे बाबत दिलेल्या जबाबातील माहिती समोर आली आहे.
आरोपी कृष्णा आंधळेच मोकारपंती ग्रुपचा अॅडमिन असल्याची माहिती समोर आली आहे. याच मोकारपंती ग्रुपच्या सदस्यांच्या जबाबात संबंधित माहितीचा उल्लेख करण्यात आला आहे. देशमुखांना मारहाण करताना आंधळेने व्हिडिओ कॅाल केला होता. ग्रुपवर तीनवेळा जखमी अवस्थेत असणाऱ्या संतोष देशमुख यांचा चेहरा दाखवण्यात आल्याची माहिती आहे.
संतोष देशमुख हत्याप्रकरणात मोकारपंती मोकारपंती ग्रुपचा अॅडमिन फरार कृष्णा आंधळेच असल्याचे समोर आले आहे. सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण करताना कृष्णा आंधळे याने याच व्हॅाट्सअॅप ग्रुपवर चार वेळा व्हिडिओ कॅाल्स केले होते. यावेळी त्याने मोबाईल देशमुखांच्या चेहऱ्याजवळ नेऊन तीनवेळा सरपंचाचा चेहरा दाखवला होता. देशमुखांच्या चेहऱ्यावरील जखमांमधून रक्त येत होते. तसेच त्यावेळी त्याच्यासोबत महेश केदार, जयराम चाटे, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे व प्रतिक घुले हे सुद्धा होते, असा जबाब मोकारपंती ग्रुपमधील चार सदस्यांनी दिलेला आहे.
आरोपी कृष्णा आंधळेने केलेल्या व्हिडिओ कॉल्सच्या वेळा :
पहिला कॉल ९ डिसेंबर रोजी ५ वाजून १४ मिनिट, ४४ सेकद (१७) सेकद)
दुसरा व्हिडिओ कॉल ५ वाजून १६ मिंट ४५ (१७ सेकद)
तिसरा व्हिडिओ कॉल ५ वाजून १९ मिनिट (२.०३ मिनिट)
चौथा व्हिडिओ कॉल ५ वाजून २६ मिनिट २० सेकंद (२.४४ मिनिट)