औरंगप्रेमींना उत्तर प्रदेशात पाठवा, चांगलाच इलाज करतो - मुख्यमंञी योगी आदित्यनाथ यांचा घणाघात

06 Mar 2025 13:43:55

Chief Minister Yogi Adityanath on abu azmi
 
नवी दिल्ली :( Chief Minister Yogi Adityanath on abu azmi ) धर्मांध औरंगजेबाविषयी प्रेम असणार्‍यांना उत्तर प्रदेशात पाठवा; आम्ही त्यांचा चांगलाच इलाज करतो,” असा घणाघात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवार, दि.  ५ मार्च रोजी विधानसभेत केला आहे.
 
समाजवादी पक्षाचा (सपा) महाराष्ट्रातील आ. अबू आझमी याने धर्मांध औरंगजेबाचे कौतुक केल्याने त्याला अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आले आहे. आझमी यांच्या विधानाचे पडसाद उत्तर प्रदेशातही उमटले आहेत. या विधानावरून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘सपा’वर सडकून टीका केली आहे.
 
उत्तर प्रदेश विधानसभेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, “सपा’साठी औरंगजेब हा अभिमानाचा विषय आहे. त्यांच्या आमदारांवर त्यांचे नियंत्रण नाही.” अबू आझमी याचे नाव न घेता त्यांनी सांगितले की, “सपा’ने त्याला पक्षातून काढून टाकावे. समाजवादी पक्षाने त्या नेत्याच्या विधानाचे खंडन करावे आणि त्याला पक्षातून काढून टाकावे. ‘सपा’ला ते जमत नसल्यास त्या आमदाराला उत्तर प्रदेशात बोलवावे; आम्ही त्याचा चांगलाच इलाज करतो. अशा लोकांवर कसा इलाज करावा, हे उत्तर प्रदेशला चांगलेच माहीत आहे,” असा टोला त्यांनी लगावला.
 
 
Powered By Sangraha 9.0