येएई (Mohammed Shami) : पाकिस्तान पुरस्कृत चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ सुरू आहे. टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी दुबईस्थित आहे. यासोबतच इस्लाम धर्मात रमजाननिमित्त रोजा म्हणजेच उपवास पकडला जात आहे. दरम्यान, टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी रोजादरम्यान, शितप्येय प्राशन करताना दिसला होता. त्यावरून त्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यावरून काहीजण त्याला आधी देश आणि नंतर धर्म असे कौतुक करत आहेत. तर काहीजण त्याला ट्रोल करत आहेत. अशातच आता एका मैलवीने मोहम्मद शमीला गुन्हेगार असल्याचे वक्तव्य केले आहे.
टीम इंडिया विरूद्ध ऑस्ट्रेलिया वनडे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्यफेरीत मोहम्मद शमी शीतप्येय पिताना दिसत आहे. त्याचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कट्टरपंथीयांनी रमजान महिन्यात उपवास का ठेवला नाही? असा प्रश्न केला. नंतर बरेलीचे मौलाना शहाबुद्दीन यांनी तर त्यांना या प्रकरणात गुन्हेगार घोषित केले आहे.
अखिल भारतीय मुस्लिम लीगचे राष्ट्रीय अध्यय मौलाना शहाबुद्दीन रझवी बरेली यांनी शमीवर विधान केले, इस्लाममध्ये रोजा अनिवार्य आहे. रोझा करणे हे प्रत्येकासाठी अनिवार्य आहे. जर कोणी जाणुनबुजून उपवास ठेवला नाही तर तो पापी आहे. क्रिकेटपटू मोहम्मद शमीनेही तेच केले. त्याने रोजा न ठेवल्याने त्याने पाप केले आहे. शरिया कायद्यानुसार, तो कचेरीत उभा राहील आणि गुन्हेगारही होईल, असे प्रतिपादन त्यांनी केले.