कल्याण : येथील जनरल एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू हायस्कूल कल्याण मधील १९७५ साली जुन्या एस एस सी च्या शेवटच्या बॅच च्या विद्यार्थी - विद्यार्थिनीचा सुवर्ण महोत्सवी स्नेह सोहळा नुकताच डोंबिवलीतील सीकेपी सभागृहात जो सौ मृदुल दवणे ह्यांनी उपलब्ध करून दिला होता तिथे नुकताच पार पडला. अर्थात १९७५ साली एस एस सी पास विद्यार्थी आजमितीस आजी - आजोबा झाले आहेत. या सोहळ्यात सुमारे ५० जण सहभागी झाले होते.
१९७५ च्या माजी विद्यार्थ्यांचा एक व्हॉट्स ॲप ग्रुप आहे, त्यांना जागृत करून या कार्यक्रमाचे निमंत्रण पाठवण्यात आले. कार्यक्रमाच्या सूत्र संचालनाची जबाबदारी विवेक हिंगणे ह्यांनी घेतली. प्रथम दिवंगत शिक्षक आणि मित्र - मैत्रिणी ना श्रद्धांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात नीलम गोवेकर यांच्या हस्ते गणेश पूजन करून तर ग्रुपच्या कोअर कमिटी सदस्यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली. पहिल्या सत्रात प्रत्येकाने स्टेज वर येऊन एस एस सी ते आता पर्यंतचा प्रवास थोडक्यात सांगितला. आपल्या नातवंडाची माहिती सांगताना सर्व आनंदित होते.
भोजनानंतर दुसऱ्या सत्रात विवेक हिंगणे, वर्षा कुलकर्णी, सरोज भोसले, मिलिंद कर्णिक, रेखा तरटे, प्रतिभा तरटे, ह्यांनी गाणी सादर केली तसेच नितीन खोपकर ह्यांनी स्वरचित कविता वाचन , गीता जोशी यांनी कल्पना चावला एक प्रवास ही सुंदर नाटिका सादर केली. यशवंत पांगारकर यांनी इतर कवीच्या कवितांचे वाचन आणि ज्येष्ठ नागरिकांसमोर भविष्यातील आव्हाने या विषयावर आपले विचार मांडले. सर्वांना शाळेच्या वास्तूचा फोटो असलेली भेट वस्तू देण्यात आली. कार्यक्रमाची सांगता सर्वांनी एकसुरात वंदेमातरम म्हणून केली.
या सुवर्ण महोत्सवी स्नेह सोहळा आयोजित करण्यासाठी न्यू हायस्कूल कोअर कमिटी चे सदस्य यशवंत पांगारकर, विवेक हिंगणे, नितीन खोपकर, मृदुला दवणे, गीता जोशी आदींनी खूप मेहनत घेतली.