अलिगड मुस्लिम विद्यापीठात होळी सण साजरा करण्यास हिंदू विद्यार्थ्यांना विरोध!

संबंधित प्रकरणी नरेंद्र मोदींकडे मागणार दाद

    06-Mar-2025
Total Views |
 
अलिगड मुस्लिम विद्यापीठ
 
लखनऊ : अलिगड मुस्लिम विद्यापीठाच्या प्रशासनाने होळी खेळण्यासाठी हिंदू विद्यार्थ्यांना विरोध दर्शवला आहे. यामुळे आता विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे याबाबत दाद मागणार असल्याचे सांगितले जात आहे. अलिगड मुस्लिम विद्यापीठ हिंदूंविरोधात भेदभावाचे धोरण स्वीकारत आहेत. हिंदू धर्माच्या धार्मिक कार्यक्रमांना आक्षेप नाही, तर विद्यापीठाच्या आवारात मुस्लिम सण साजरे केले जात आहेत. मग हिंदू धर्मांना विरोध का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
 
विद्यापीठातील पदव्युत्तर विभागातील विद्यार्थ्यांनी २५ फेब्रुवारी रोजी हिंदू विद्यार्थ्य़ांना एएमयूच्या प्रॉक्टरला कुलगुरूंच्या नावे एक पत्र सादर केले, ज्यात ९ मार्च रोजी एमआयएमयूच्या एनआरएससी क्लबमध्ये होळी मिलन कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी मागितली होती. या संदर्भात विद्यार्थ्यांनी पुन्हा प्रोफेसर वसीम अली यांची भेट घेतली होती. प्रोफेसर यांनी कुलगुरूंसोबत बैठकही घेतली. होळी मिलन कार्यक्रम आयोजित करण्याबाबतच्या चर्चेनंतर, होळी मिलन कार्यक्रम आयोजित करण्यास परवानगी दिली जाणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे.
 
 
 
होळी सण साजरा करण्यापासून का रोखले गेले?  
 
दरम्यान, झालेल्या बैठकीच्या चर्चेचा ऑडिओ आणि व्हिडिओ आमच्याकडे आहेत. जर आम्हाला परवानगी मिळाली नाही तर आम्ही ते ऑडिओ आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करू, एएमयूमध्ये इतर धर्मांचे धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. जरी हिंदू विद्यार्थ्यांना त्यांच्यावर कोणताही आक्षेप घेण्यात आलेला नाही, तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणात एमयूला लघु भारत म्हटले असता हिंदू विद्यार्थ्यांना होळी सण साजरा करण्यापासून का रोखले जात आहे? असा प्रश्न आहे.
 
"...तर नरेंद्र मोदींकडे याबाबतीत तक्रार करू" 
 
भारत हिंदुबहुल असूनही भारतात हिंदू धर्माचे सण साजरे करू दिले जात नाहीत. एएमयूच्या कुलगुरू प्रोफेसर नैमा खातून यांनीही सर्व धर्मांचा आदर करत त्यांच्या कार्यक्रमाला परवानगी द्यावी. जर आम्हाला होळी मिलन समारोह आयोजित करण्याची परवानगी दिली गेली नाही, तर आम्ही ही बाब देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निदर्शनात आणून देणार आहोत, असे त्या म्हणाल्या.