देहरादून : उत्तराखंडमध्ये अवैध मदरशांविरोधात प्रशासनाने कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यातील देहरादूनमध्ये आतापर्यंत ११ अवैध मदरशांना कुलूपबंद करण्यात आले आहे. उत्तराखंड राज्याचा विचार केल्यास ५०० हून अधिक अवैध मदरशांवर कारवाई होणार असल्याचे बोलले जात आहे.
या प्रकरणात सांगण्यात येत आहे की, केवळ अवैध मदरशांविरोधात तक्रार दाखल करण्यात येत आहे. या तपासादरम्यान काही मदरशांचे रजिस्टर करण्यात आलेल्या कागदपत्रांची माहिती अद्यापही समोर आलेली नाही. मदरशांना कुलूपबंद करण्यासाठी २८ फेब्रुवारी रोजी आदेश पारित करण्यात आला होता. ८८ परिपत्रक मान्य करण्यासाठी मदरसा बोर्डाने ५१ अवैध मदरशांना मान्यता दिली आहे.
देहरादून जिल्ह्यातील मजिस्ट्रेट सविन बंसलने सांगितले की, देहरादून तहसीलमध्ये १६ अवैध मदरसे आहेत. अशातच विकासनगर मध्ये ३४, डोईवालमध्ये आणि कलसीमध्ये ११ अवैध मदरसे असल्याचे सांगण्यात येत आहे.
या प्रकरणी तपासात मदरशांजवळील पंजीकरणाच्या संबंधित प्रकरणी कोणतेही कागदपत्रे हाती आले नाहीत, याबाबत आता प्रशासनाने मदरशांना कुलूपबंद करत एक संयुक्त पथक तयार केले आहे. या पथकाने जिल्हा प्रशासन, पोलीसांसोबतच अल्पसंख्यांक आयोग आणि मदरसा बोर्डाचाही यात समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.