वसईच्या किनाऱ्यावर निळी जीवदीप्ती; धक्का निळ्या लाटांनी उजळला

05 Mar 2025 21:20:27
bioluminiscent waves
 
 
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - वसई-भाईंदर रो-रो सेवेच्या धक्क्यावर मंगळवार दि. ५ मार्च रोजी रात्री निळ्या लाटांचे दर्शन झाले. वसईतील सागरी निरीक्षकांनी या निळ्या लाटांची नोंद केली (bioluminiscent waves). या निळ्या लाटांचे कारण म्हणजे 'बायोलूमिनेसेन्ट डिनोफ्लॅगलेट्स'( नोक्टीलिका) हा सूभ्म जीव (bioluminiscent waves). या समुद्री सूक्ष्म जीवांमधून उत्सर्जित होणाऱ्या निळ्या प्रकाशामुळे समुद्राच्या लाटांवर निळा प्रकाश पसरतो. (bioluminiscent waves)
 
 
साधारण हिवाळी हंगामात महाराष्ट्राच्य़ा किनाऱ्यांवर आदळणाऱ्या लाटा या निळ्या रंगाने प्रकाशित होत असल्याचे दिसून येतात. अशाच प्रकारच्या निळ्या लाट सोमवार दि. ४ मार्च आणि मंगळवार दि. ५ मार्च रोजी वसई-भाईंदर रो-रो सेवेच्या धक्क्यावर दिसून आल्या. सागरी जीवांचे निरीक्षण करणारे दत्ता पेंडणेकर यांनी वसईच्या धक्क्यावर या निळ्या लाटांची नोंद केली. मराठीत या प्रकाराला जीवदीप्ती म्हटले जाते. 'बायोलूमिनेसेन्ट डिनोफ्लॅगलेट्स' हे जीव मोठ्या प्रमाणात किनाऱ्यापट्टीनजीकच्या भागात येतात. या जीवांना धोका जाणवल्यास ते आपल्या शरीरातून चकाकणारा निळा प्रकाश उत्सर्जित करतात. समुद्राच्या लाटा एकमेकांवर आदळल्यामुळे या जीवांना धोका निर्माण झाल्यासारखे वाटते. त्यामुळे ते निळा प्रकाश उत्सर्जित करत असल्याने लाटांवर निळा प्रकाश पसरतो.
Powered By Sangraha 9.0