प्रतिज्ञापत्रासाठी 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ! महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा निर्णय

    05-Mar-2025
Total Views |

 No stamp duty for affidavit in Maharashtra chandrashekhar bawankule
 
मुंबई: ( No stamp duty for affidavit in Maharashtra ) राज्य सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच नागरिकांना मोठा दिलासा दिला. आता शासकीय कामासाठी नागरिकांचा खिसा कापल्या जाणार नाही. त्यांना प्रमाणपत्रासाठी मुद्रांक शुल्क भरण्याचा ताप कमी झाला आहे. काही प्रमाणपत्रासाठी नागरिकांना प्रतिज्ञापत्र सादर करावे लागते. यापूर्वी राज्य सरकारने 500 रुपयांचे प्रतिज्ञापत्र सादर करणे अनिवार्य केले होते.त्याशिवाय प्रमाणपत्र देण्यात येत नव्हते. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिज्ञापत्रासाठी 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.
 
या निर्णयाचा विद्यार्थी, पालक आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश महसूल मंत्री बावनकुळे यांनी दिले आहेत.
 
‘या’ प्रमाणपत्रांसाठी लागणारे प्रतिज्ञापत्रातील मुद्रांक शुल्क माफ! 
 
* जात पडताळणी प्रमाणपत्र
* उत्पन्नाचा दाखला
* रहिवासी प्रमाणपत्र
* नॉन क्रिमिलेयर सर्टिफिकेट
* राष्ट्रीयतत्व प्रमाणपत्रासह
* शासकीय कार्यालयात दाखल करायच्या सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागणारे 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्यूटी) माफ
* यापुढे एका साध्या कागदावर स्वसाक्षांकित (सेल्फ अटेस्टेट ) अर्ज लिहून प्रमाणपत्र तहसील कार्यालयातून मिळू शकेल.
* दहावी, बारावीच्या निकालानंतर विद्यार्थी व पालकांचा या सर्व प्रकारच्या प्रमाणपत्रासाठी लागणारा एकूण 3 ते 4 हजारांचा खर्च वाचणार.