हिंदू मुलीच्या लग्नासाठी बनवत होता 'रोटी', थुंकी लावण्याचा व्हिडिओ व्हायरल! पोलीसांनी दिला चोप

    05-Mar-2025
Total Views |
 
थुंक जिहाद
 
लखनऊ : उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधून पुन्हा एकदा अन्नामध्ये थुंक जिहादाचे प्रकरण समोर आले आहे. अन्नाला अशुद्ध बनवत पावित्र्य भंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकरणी आता पोलीस कारवाईसाठी तक्रारदार रस्त्यावर उतरले आहेत. अन्नामध्ये थुंकणाऱ्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. एका विवाहासाठी युवक रोटी बनवत होता. त्यावेळी तो त्या रोटीमध्ये अनेकदा थुंकताना दिसत आहे. या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पुढे सांगण्यात आले की, हा व्हिडिओ भोजपूर पोलीस ठाण्यातील सैदापूर गावातील आहे.
 
या प्रकरणी आता सबंधित व्यक्तीवर पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे. मोदीनगरातील एसीबी ज्ञान राय म्हणाले की, ४ मार्च रोजी समाज माध्यमावरून एक व्हिडिओ समोर आला. ज्यात विवाह समारंभात कॅटरर्समध्ये काम करणारा कट्टरपंथी युवक रोटी बनवत असताना रोटीत थुंकताना दिसत आहे. व्हिडिओची सखोल चौकशी केल्यानंतर व्हिडिओ हा २३ फेब्रुवारी २०२५ चा असल्याचे समोर आले आहे.
 
 
 
विनोद कुमार यांच्या युवतीचा विवाह होता. या विवाह सोहळ्यात एका कॅटरर्समध्ये रोटी बनवणाऱ्या युवकाचे नाव फरमान असे आहे. सैदापूर या गावातील रहिवासी असून पोलिसांनी त्यांच्यावर संबंधित कलमांवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरमानला आता पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यावर इतर आवश्यक कारवाई केली जाईल.