चंदीगड : सुंभ पळाला पण पीळ जाईना अशी अवस्था आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांची आहे. केजरीवाल विपश्यनेलाही गेले असता त्यावेळी त्यांना व्हिआयपी सुरक्षेची ट्रिटमेंट देण्यात आली. त्यावरून आता दिल्ली सरकारचे मंत्री मनजिंदर सिंग सिरसा यांनीही केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल केला. अरविंद केजरीवाल यांचा साधेपणा एक बनावट दिखावा असल्याचे ते म्हणाले आहेत. मंगळवारी ४ मार्च २०२५ रोजी पंजाबमधील होशियापूरमध्ये ते पोहोचले.
ते धम्मध्वज या विपश्यन केंद्रातून जाऊन आल्यानंतर त्यांच्यासोबत आता पंजाबमध्ये व्हिआयपी ट्रीटमेंटचा फायदा घेत आहेत. त्यांच्यासोबत वाहनांचा मोठ्या प्रमाणात ताफा आहे. तो पंजाबमध्ये विपश्यना करण्यासाठी गेला आहे. भगवंत मान यांचे स्वागत करण्यासाठी ते व्यस्त आहेत. त्यांच्या या ताफ्यामुळे व्हि़आयपी ट्रीटमेंटवर सडकून टीका होत आहे. यावेळी पक्षाच्या खासदार स्वाती मालीवाल यांनीही त्यांच्यावर टीका केली आहे.
केजरीवाल यांच्याभोवती वाहनांचा ताफा आहे. जसे की स्कॉर्पिओ, थारसारख्या चारचाकी वाहनांनी केजरीवाल यांना व्हि़आयपी सुरक्षा देण्यात आली आहे. वाहनांना बुलेटप्रुफ काचा आहेत. तसेच त्यांच्यासोबत पत्नी सुनिता केजरीवालही आहेत. ते पाहून आता, स्वाती मालीवाल यांनी टीप्पणी स्वाती मालवील म्हणाल्या की, केजरीवाल यांचा ताफा हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा मोठा होता.
पुढे त्या म्हणाल्या की, अरविंद केजरीवाल लोकांना इतके घाबरतात ज्यांनी त्यांना इतके प्रेम दिले? व्हिआयपी संस्कृतीवरून संपूर्ण जग टीका करणारे केजरीवाल आज डोनाल्ड ट्रम्पपेक्षा मोठ्या सुरक्षा कवचात फिरताना दिसत आहेत.
दरम्यान, दिल्ली सरकारच्या मनजिंदर सिंग सिरसा यांनीही केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, अरविंद केजरीवाल यांचा हा बनावट साधेपण आणखी एक नाटक आहे. भ्रष्टाचार आणि अहंकारात बुडालेल्या व्यक्तीला विपश्यनेचा खरा अर्थ समजेल? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.