वल्लव रे नाखवा! महाराष्ट्र शासनाकडून कोळी गीत नृत्य महोत्सवाचे आयोजन

    04-Mar-2025
Total Views |

koligeet 1

मुंबई : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वावाला कोळी गीतांची आणि कोळी नृत्यांची समृद्ध परंपरा लाभली आहे. याच परंपरेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय कोळी गीत नृत्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दांडेश्वर शंकर मंदिराच्या प्रांगणात दि. ७ मार्च ते दि. ९ मार्च असे तीन दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवाणी रसिक प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.

दि. ७ मार्च रोजी अरूण पेदे आणि वेसावकार मंडळी, दांडा कोळी ब्रास बँड पथक मास्तर हरेश पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने दर्याचा राजा हा कार्यक्रम सादर करणार आहेत. दि. ८ मार्च रोजी दत्ता भोईर आणि उरणकर मंडळी, डोंगरीकर ब्रास बँड पथक मास्तर उपकार डोंगरीकर यांच्या संयुक्त विद्यमाने ' नाखवा माझा दर्याचा राजा ' हा कार्यक्रम सादर करणार आहेत. दि.९ मार्च रोजी सचिन चिंचय आणि मंडळी, स्वरांजली ब्रास बँड पथक मास्तर प्रणय पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने कोळी गीतांचा आणि नृत्यांचा कार्यक्रम सादर करणार आहेत.