युक्रेनची लष्करी मदत अमेरिकेने थांबवली

    04-Mar-2025
Total Views |

US stops military aid to Ukraine
 
नवी दिल्ली: ( US stops military aid to Ukraine ) युक्रेनला अमेरिकेतर्फे देण्यात येणारी लष्करी मदत थांबवण्याचा निर्णय ट्रम्प प्रशासनाने घेतला आहे.
 
गेल्या आठवड्यात युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्याशी झालेल्या संघर्षानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनला देण्यात येणारी लष्करी मदत थांबवली आहे. त्यामुळे आता युक्रेनच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
 
जानेवारीमध्ये पदभार स्वीकारल्यानंतर ट्रम्प यांनी युक्रेन आणि रशियाबद्दलच्या अमेरिकेच्या धोरणात बदल करून रशियासोबत चर्चा सुरू केली आहे. गत आठवड्यात शुक्रवारी व्हाईट हाऊसमध्ये झेलेन्स्की यांच्याशी झालेल्या वादळी चर्चेमध्ये ट्रम्प यांनी युक्रेनला आतापर्यंत केलेल्या मदतीविषयी युक्रेनला जाणीव नसल्याचा टोला लगावला होता. दरम्यान, अमेरिकेच्या या निर्णयाचे रशियाने स्वागत केले आहे. अमेरिकेची लष्करी मदत थांबवणे हे शांततेसाठी सर्वोत्तम योगदान असेल असे रशियाने म्हटले आहे.