सीएसएमटी प्लॅटफॉर्म १२/१३ची लांबी ३०५ मीटरने वाढली

विस्तारित प्लॅटफॉर्म १२/१३ ची मध्य रेल्वे महाव्यवस्थापकांकडून पाहणी

    04-Mar-2025
Total Views |

central railway



मुंबई, दि.४ : प्रतिनिधी 
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे २४ कोच गाड्या सामावून घेण्यासाठी प्लॅटफॉर्म १२ आणि १३ चा विस्तार करण्यात आला. या प्लॅटफॉर्मच्या विस्तारामुळे प्रवाशांची सोय आणि कार्यक्षमता वाढेल. हा प्लॅटफॉर्म ३०५ मीटरने वाढवण्यात आला असून एकूण लांबी ६९० मीटर झाली आहे. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्म वीर मीना यांनी सीएसएमटी येथे नुकत्याच पूर्ण झालेल्या नॉन-इंटरलॉकिंग (एनआय) कामांची आणि प्लॅटफॉर्म १२ आणि १३ च्या विस्ताराची पाहणी केली.


मध्य रेल्वेने दि. २८ फेब्रुवारी/दि. १ मार्च २०२५ च्या मध्यरात्री ते दि. २/ ३ मार्च २०२५ पर्यंत प्री आणि पोस्ट नॉन-इंटरलॉकिंग (एनआय) कामांसाठी विशेष ब्लॉक घेतले होते. या कमिशनिंगमध्ये विद्यमान सीमेन्स-निर्मित इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टममध्ये बदल करण्यात आले. ते फक्त दि. १ मार्च २०२५ रोजी रात्री ११:१५ ते दि. २ मार्च २०२५ रोजी रात्री ९:१५ पर्यंत म्हणजे १० तासांच्या विक्रमी वेळेत पूर्ण झाले.


ट्रॅक आणि सिग्नलमध्ये बदल


टर्नाउट: २ काढून टाकण्यात आले असून १ नवीन समाविष्ट करण्यात आला.

सिग्नल: ३ सिग्नल बदलले, २ शंटिंग सिग्नल मुख्य सिग्नलमध्ये रूपांतरित केले आणि १ नवीन शंटिंग सिग्नल जोडण्यात आला.

कार्यक्षमता: मार्गांची संख्या २७८ वरून २८५ पर्यंत वाढली.

सुरक्षिततेचे उपाय: वाढीव सुरक्षिततेसाठी ड्युअल डिटेक्शन ट्रॅक सर्किट्स बसवण्यात आले.