Oscars 2025 : अभिनेत्री प्रियंका चोप्राच्या ‘अनुजा’ला अपयश, ‘आय एम नॉट अ रोबोट’ला पुरस्कार!

    03-Mar-2025
Total Views |
 
 
Priyanka Chopra
 
 
नवी दिल्ली : प्रियंका चोप्राच्या ‘अनुजा’ या लघुपटाला ऑस्कर २०२५ मध्ये लाईव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्म श्रेणीतील पुरस्कार जिंकता आला नाही. अॅडम जे ग्रेव्ह्ज दिग्दर्शित या चित्रपटाला नामांकन मिळालं होतं, मात्र प्रतिष्ठित पुरस्कार डच भाषेतील ‘आय एम नॉट अ रोबोट’ या चित्रपटाने पटकावला.
 
 
गुनीत मोंगाची तिसरी ऑस्कर नामांकने
'अनुजा' या लघुपटाच्या कार्यकारी निर्मात्यांमध्ये दोन वेळा ऑस्कर जिंकणारी गुनीत मोंगा आणि प्रियंका चोप्रा यांचा समावेश होता. मिंडी कॅलिंग यांनी या संवेदनशील आणि संघर्षमय कथा असलेल्या चित्रपटाची निर्मिती केली. अनन्या शानभाग, सजदा पठाण आणि नागेश भोसले यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.
 
यंदा या श्रेणीत ऑस्करसाठी जवळपास असलेले इतर चित्रपट म्हणजे ‘अ लियन’, ‘द लास्ट रेंजर’ आणि ‘द मॅन हू कुड नॉट रिमेन सायलेन्ट’ होते. ‘अनुजा’ या चित्रपटाची कथा नऊ वर्षांची अनुजा आणि तिची मोठी बहीण पलक यांच्याभोवती फिरते, ज्या गारमेंट कारखान्यात काम करतात.
 
गुनीत मोंगासाठी ही ऑस्करमधील तिसरी नामांकने होती. याआधी तिच्या ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ आणि ‘पीरियड: एंड ऑफ सेंटेन्स’ या चित्रपटांनी ऑस्कर जिंकले होते.
 
 
प्रियंका चोप्राने चित्रपटाबद्दल व्यक्त केली भावना
अभिनेत्री प्रियंका चोप्राने या चित्रपटाचे वर्णन करताना सांगितले की, "हा सुंदर चित्रपट अशा विषयावर प्रकाश टाकतो, जो जगभरातील कोट्यवधी मुलांवर परिणाम करतो. त्यांना एकतर एक अज्ञात भविष्य निवडायचं असतं किंवा आपल्या वर्तमान परिस्थितीशी झगडायचं असतं."
 
जागतिक महोत्सवांमध्ये ‘अनुजा’ला मिळाली प्रशंसा
'अनुजा' या लघुपटाला हॉलीशॉर्ट्स फिल्म फेस्टिवल, न्यू यॉर्क शॉर्ट्स इनटरनॅशनल फिल्म फेस्टिवल आणि मॉन्टक्लेअर फिल्म फेस्टिवल यांसारख्या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये मोठी प्रशंसा मिळाली.
 
ओटीटी रिलीज :
५ फेब्रुवारी रोजी नेटफ्लिक्स वर या लघुपटाचा डिजिटल प्रदर्शित झाला.
 
'लाईव्ह अॅक्शन शॉर्ट' विजेता :
ऑस्कर जिंकणारा ‘आय एम नॉट अ रोबोट’ हा २०२३ मधील डच भाषेतील विज्ञान-कल्पनारंजन (Sci-Fi) लघुपट आहे. व्हिक्टोरिया वॉर्मरडॅम यांनी या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन केले आहे. यामध्ये लारा नावाच्या मुलीची कथा आहे, जिला कॅपचा टेस्ट सतत फेल झाल्यानंतर एक अजब जगात टाकलं जातं.